सांगली - कृष्णा नदीच्या पात्रात लाखो लीटर दूषित पाणी मिसळत असल्याची बातमी ईटीव्ही भारतने प्रसिद्ध केली होती. याची गंभीर दखल प्रदूषण महामंडळाकडून घेण्यात आली आहे. यासंबंधी सांगली महापालिकेला नोटीस बजावण्यात आली आहे
ईटीव्ही भारतच्या बातमीची प्रदुषण महामंडळाने दखल घेतली
स्वच्छ, निर्मळ कृष्णा नदीचे पात्र सध्या दूषित बनले आहे. सांगली शहरातील लाखो लीटर सांडपाणी खुलेआम कृष्णेच्या पात्रात मिसळत आहे. महापालिकेच्या दुर्लक्षामुळे कृष्णा नदी प्रदूषित होत आहे. शेरीनाला आणि इतर कारणांमुळे दररोज लाखो लीटर सांडपाणी थेट कृष्णा नदीच्या पात्रात मिसळत आहे.
हेही वाचा -सांगली : ढगाळ वातावरणामुळे ४० हजार एकर क्षेत्रातील द्राक्षबागा पुन्हा संकटात..!
कृष्णा नदीच्या प्रदूषणाबाबत ईटीव्ही भारतने सोमवारी 'प्रदूषणाच्या विळख्यात कृष्णा नदी,पालिकेचे दुर्लक्ष' या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती. प्रदूषण महामंडळाच्या निदर्शनास ही बाब आली. याची गंभीर दखल घेत, प्रदूषण महामंडळ उपप्रादेशिक अधिकारी नवनाथ औताडे यांनी प्रत्यक्ष कृष्णा नदीवर जाऊन पाहणी केली. दूषित पाण्याचे नमुने घेतले. ते तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवले आहेत.
हेही वाचा -ऊसतोड उशिरा सुरु झाल्याने ऊसतोड कामगारांना आर्थिक फटका
मिसळत असलेल्या दूषित पाण्याबाबत सांगली महापालिकेला नोटीस बजावली आहे. पालिका प्रशासनाने याबाबत काय उपयोजना केल्या आहेत, याचा खुलासा मागितला आहे. तसेच, कृष्णा नदीच्या प्रदूषणाबाबतचा अहवाल कोल्हापूर येथील प्रादेशिक कार्यालयाकडे पाठवण्यात आल्याचे प्रदूषण महामंडळ उपप्रादेशिक अधिकारी नवनाथ औताडे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना स्पष्ट केले आहे.