महाराष्ट्र

maharashtra

क्रिकेट खेळणाऱ्या तरूणांवर पोलिसांकडून कारवाई

By

Published : May 11, 2021, 3:52 PM IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडक लॉकडाऊन सुरू आहे. मात्र, अनेक ठिकाणी लॉकडाऊनमधील नियमांचे उल्लंघन होत आहे. असेच नियम मोडून क्रिकेट खेळणाऱ्या १० तरूणांवर सांगली पोलिसांनी कारवाई केली

क्रिकेट खेळणाऱ्या तरूणांवर कारवाई
क्रिकेट खेळणाऱ्या तरूणांवर कारवाई

सांगली - शहरात लॉकडाऊनचे नियम मोडून क्रिकेट खेळणाऱ्या १० तरुणांवर सांगली पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. सांगलीच्या आंबेडकर स्टेडियम येथे १४ तरुण क्रिकेट खेळत होते. पोलीस येतायेत अशी खबर लागताच यातील ४ जण पळून गेले.



क्रिकेट खेळणाऱ्या तरूणांवर कारवाई

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडक लॉकडाऊन सुरू आहे. मात्र, अनेक ठिकाणी लॉकडाऊनमधील नियमांचे उल्लंघन होत आहे. सांगली शहरात अनेकजण विनाकारण रस्त्यावर फिरत असल्याच्या घटना घडत आहेत. या लोकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. परंतु कारवाई होत असतानाही काही लोक नियम पाळाताना दिसत नाहीत. शहरात काही तरूण डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम या ठिकाणी लॉकडाऊनचा नियम तोडून खुलेआम क्रिकेट खेळत असल्याचे समोर आले. याची माहिती सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांना मिळाली. त्यांनतर सिंदकर यांनी यातील १४ तरुणांपैकी १० तरूणांना ताब्यात घेतले. दरम्यान पोलीस आलेले पाहिले तेव्हा यातील ४ तरूण पळून गेले.

हेही वाचा -शंभर कोटी वसुली प्रकरणी अनिल देशमुखांविरोधात ईडीकडून गुन्हा दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details