जत (सांगली)- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने कडक लॉकडाऊन जाहीर केले आहे. लॉकडाऊनमध्ये मद्यविक्रीला बंदी घातलेली आहे, असे असताना जत बिळूर रस्त्यावर असलेल्या आशीर्वाद गार्डनचे मालक निलेश भास्कर जाधव यांनी विदेशी मद्याची विक्री करत होते. याची माहिती मिळताच जत पोलिसांनी छापा टाकून ७,६३,२०० लाखांचा मुद्देमाल जप्त केला.जाधव यांच्या विरोधात जत पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
जतमध्ये अवैध विदेशी दारू विक्रीवर पोलिसांचा छापा; आठ लाखांचा मुद्देमाल जप्त कोरोना काळात मद्याची दुकाने बंद असल्याने तळीरामांची चांगलीच गोची झाली आहे. त्यामुळे चढ्या भावाने मद्य विक्री सुरू आहे. चढ्या भावाने मिळत असले तरी तळीराम मद्य खरेदी करतात. याचा फायदा उचलण्यासाठी काही जण अवैध पद्धतीने मद्य विक्री करीत आहेत.जत बिळूररोड येथील हॉटेल आशीर्वाद गार्डन येथे अवैध मद्यविक्री करणाऱ्या मालक निलेश जाधव याला पोलिसांनी अटक केले आहे.
खुलेआम हॉटेलमध्येच सुरू होती मद्यविक्री -
शहरातील बिळूर रोड येथे निलेश जाधव यांचे आशीर्वाद गार्डन आहे. लॉकडाऊन काळात मद्यापींना होम डिलिव्हरी करण्याची परवानगी दुकानदारांना देण्यात आली आहे. मात्र, जाधव हे खुलेआम नियमाचे उल्लंघन करून चढ्या भावाने देशी आणि विदेशी मद्याची विक्री करीत असल्याची माहिती जत पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी निलेश जाधव यांच्या हॉटेलवर छापा टाकून कारवाई केली.
आठ लाखांचा मुद्देमाल जप्त,जत पोलिसांची कामगिरी -
यामध्ये बेकायदा विदेशी कंपनीची 180 मिलीचे 92 बॉक्स तसेच 750 मिलीचे 14 बॉक्स असा एकूण ७,६३,२०० लाखाचा दारूचा साठा मिळून आला आहे. सदरची कामगिरी पोलीस अधिकारी रत्नाकर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक गोपाल भोसले, पोलीस हवालदार प्रवीण पाटील, सचिन जवंजाळ, सचिन हक्के, वहिदा मुजावर, दत्ता लोखंडे आदींनी केली.