सांगली-संचारबंदी काळात अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्या एका घरावर सांगली पोलिसांनी छापा टाकला आहे. यावेळी एकास अटक करत सुगंधी तंबाखू व सुपारी, गुटखा असा एकूण 10 लाख 22 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
संचारबंदीत अवैध गुटखा - सुगंधी तंबाखूची विक्री, दहा लाखांचा मुद्देमाल जप्त - Police
अवैध असणाऱ्या गुटख्याची संचारबंदी काळात विक्री सुरू असल्याचे समोर आले असून ,हा माल कुठून आला याची चौकशी पोलीस करत आहेत.
संचारबंदी काळात अवैध गुटखा, सुगंधी तंबाखूची विक्री ,छाप टाकत दहा लाखांचा मुद्देमाल जप्त ,एकास अटक...
शहरामध्ये अवैधरित्या संचारबंदी काळात खुलेआमपणे सुगंधी तंबाखू,सुपारी,गुटख्याची विक्री सुरू असल्याची माहिती सांगली शहर पोलिसांनी मिळाली होती.त्यानुसार शहर पोलिसांनी अन्न आणि औषध प्रशासन पथकासह शहरातील जामवाडी येथील एका घरावर छापा टाकला.
पोलिसांनी त्याठिकाणी सुगंधी तंबाखू व सुपारी, गुटखा असा एकूण १० लाख २२ हजारांचा मुद्देमाल आढळून हा सर्व मुद्देमाल जप्त करत निखील महादेव सूर्यवंशी या तरुणास या प्रकरणी अटक केली आहे.