सांगली - चारचाकी वाहनांमध्ये अवैधरित्या घरगुती गॅस भरणाऱ्या एका अड्ड्यावर शहर पोलिसांनी छापा टाकला आहे. या छाप्यात ११ सिलेंडर टाक्यासह एक मारुती गाडी असा १ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शहराजवळील नांद्रे येथे ही कारवाई करण्यात आली असून एकाला अटक करण्यात आले आहे.
वाहनांमध्ये अवैधरित्या गॅस भरणाऱ्या अड्ड्यावर छापा; १ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त - ILLEGAL GAS FILLING CENTER
नांद्रे या गावात अवैधरित्या चारचाकी वाहनांच्या मधून घरगुती गॅस सिलेंडर मधून गॅस भरून देण्याचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती
नांद्रे या गावात अवैधरित्या चारचाकी वाहनांच्या मधून घरगुती गॅस सिलेंडर मधून गॅस भरून देण्याचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. त्यानुसार गावातील अमोल पाटील नामक व्यक्तीच्या घरावर पथकाने छापा टाकला असता, या ठिकाणी एचपी कंपनीचे ११ सिलेंडर टाक्या, इलेक्ट्रॉनिक वजन काटा, गॅस भरण्याची मशीन आणि एक चारचाकी गाडी असा १ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी कोमल पाटील (वय ३६) याला अटक करण्यात आले आहे.