सांगली- हस्तीदंतांची विक्री करणाऱ्या एका तस्कराला मिरजमध्ये अटक करण्यात आली आहे. पाऊणे नऊ लाखांचे चार छोटे हस्तीदंत यावेळी जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली. सुहेल मेहतर, (वय- ३१,रा.तासगाव, सांगली) असे अटक करण्यात आलेल्या तस्कराचे नाव आहे.
सांगलीत चार हस्तीदंतासह तस्कराला अटक; लाखोंचा मुद्देमाल जप्त - sangli police
हस्तीदंतांची विक्री करणाऱ्या एका तस्कराला मिरजमध्ये अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीची तपासणी केली असता, त्याच्याकडे हत्तीचे चार दात आढळून आले.
हस्तीदंतांची विक्री
मिरजेत सुहेल हा हस्तीदंत विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. यानुसार पोलिसांनी शहरातील नूर हॉटेल जवळ सापळा रचून दुचाकीवरुन आलेल्या संशयित सुहेल याला ताब्यात घेतले.
पोलिसांनी आरोपीची तपासणी केली असता, त्याच्याकडे हत्तीचे चार दात आढळून आले. पोलिसांनी सुहेल यास अटक करून त्याच्या जवळचे पावणे नऊ लाखांचे चार हस्तीदंत, एक दुचाकी व मोबाईल असा एकूण ९ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.