महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये आरक्षण द्या, परीट समाजाची मागणी - bjp

परीट समाजाला अनुसूचित जातीमधून आरक्षण द्यावे आणि त्याचा अहवाल केंद्र शासनाकडे पाठवण्यात यावा, या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानावर परीट  समाजाच्यावतीने आंदोलन सुरू आहे. मुंबईतील आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी जिल्ह्यातील परीट समाजाकडून निदर्शने करण्यात आली

अनुसूचीत जातीमध्ये आरक्षण द्या, परीट समाजाची मागणी

By

Published : Jul 23, 2019, 6:54 PM IST

सांगली - परीट समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करावा, यासह इतर मागण्यांसाठी मुंबईत सुरू असलेल्या परीट समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज (मंगळवार) सांगलीत परीट समाजाकडून आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर परीट बांधवांकडून यावेळी निदर्शने करण्यात आली.

अनुसूचीत जातीमध्ये आरक्षण द्या, परीट समाजाची मागणी

परीट समाजाला अनुसूचित जातीमधून आरक्षण द्यावे आणि त्याचा अहवाल केंद्र शासनाकडे पाठवण्यात यावा, या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानावर परीट समाजाच्यावतीने आंदोलन सुरू आहे. मुंबईतील आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी जिल्ह्यातील परीट समाजाकडून निदर्शने करण्यात आली. राज्य शासनाने परीट समाजाच्या सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेऊन, केंद्र सरकारकडे समाजाच्या पुनरआरक्षणाबाबत अहवाल पाठवावा अशी मागणी परीट समाजाने सांगली जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details