सांगली -सांगली, मिरजेतील पूरबाधित भागातील नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी प्रशासनाकडून सुरुवात झाली आहे. महापालिका, महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाकडून प्रत्यक्ष पंचनामा करण्याचे काम केले जात आहे. पूरग्रस्तांच्या दारात पोहचून हे पंचनामे करण्यात येत आहेत.
तातडीच्या मदतीसाठी सांगलीतील पूरग्रस्तांचे प्रत्यक्ष पंचनामे सुरू - sangli flood update
सांगली जिल्ह्यातला महापूर ओसरला आहे. शासनाकडून पूरग्रस्तांसाठी 10 हजार रुपये रोख आणि 5 हजारांचे धान्य अशी मदत जाहीर करण्यात आली आहे.
मदतीसाठी पंचनामे सुरू -
सांगली जिल्ह्यातला महापूर ओसरला आहे. शासनाकडून पूरग्रस्तांसाठी 10 हजार रुपये रोख आणि 5 हजारांचे धान्य अशी मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यासाठी प्रशासनाकडून प्रत्यक्ष पंचनाम्यास सुरुवात झाली आहे. सांगली महापालिका क्षेत्रात या पंचनाम्यास सुरुवात झाली आहे. पालिका क्षेत्रात एकूण 37 पथके गठीत करण्यात आले असून, त्यांच्याकडून घरगुती पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे. तर 22 पथके व्यापारी आस्थापनांच्या नुकसानीचे पंचनामे करणार आहेत. प्रत्येक पथकात तीन कर्मचारी आणि एक व्हिडिओ ग्राफर देण्यात आला आहे. हे पथक घरोघरी जाऊन माहिती घेत आहे. तसेच नुकसानीबाबत शासनाच्या निकषानुसार फॉर्म भरले जात आहेत. हे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर याचा अहवाल शासनाला जमा केला जाणार आहे.