महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येणारी जागतिक मदत कुठे आहे? - कदम - विश्वजित कदम लेटेस्ट न्यूज

जागतिक पातळीवरून कोरोनासाठी येणारी मदत कुठे चालली आहे ? असा सवाल कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी केंद्र सरकारला केला आहे. तसेच राज्यात सध्या ऑक्सिजनचा तुटवडा आहे, या पार्श्वभूमीवर भारती विद्यापीठ पुणे आणि सांगलीमध्ये लवकरच ऑक्सिजन जनरेशन प्लांटची निर्मिती करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

विश्वजित कदम
विश्वजित कदम

By

Published : May 8, 2021, 4:07 PM IST

सांगली -जागतिक पातळीवरून कोरोनासाठी येणारी मदत कुठे चालली आहे ? असा सवाल कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी केंद्र सरकारला केला आहे. तसेच राज्यात सध्या ऑक्सिजनचा तुटवडा आहे, या पार्श्वभूमीवर भारती विद्यापीठ पुणे आणि सांगलीमध्ये लवकरच ऑक्सिजन जनरेशन प्लांटची निर्मिती करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

सांगलीतील कोरोना परिस्थितीबाबत कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, जिल्ह्याला सध्या दररोज 40 टन ऑक्सिजनची गरज आहे. कर्नाटकच्या बेल्लारी येथून होणारा 10 टन ऑक्सिजनचा पुरवठा अचानक बंद झाला. त्यामुळे 2-3 दिवसांपूर्वी ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. मात्र आपण वैयक्तिक पातळीवर ऑक्सिजन कंपन्यांशी चर्चा व पाठपुरावा करून तो सोडवला आहे. त्यामुळे आता जिल्ह्याला 44 टन ऑक्सिजन दररोज मिळत आहे. त्यामुळे जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा नसल्याची माहिती त्यांनी दिली.

आणखी 50 व्हेंटीलिटर दाखल होणार

तसेच जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचे 1200 डोस उपलब्ध आहेत. तर कोरोनाच्या या स्थितीत आणि भविष्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयात येत्या काही दिवसांत एकूण 125 जम्बो ऑक्सिजन सिलिंडर बसविण्यात येणार आहेत. त्याच बरोबर सध्या शासकीय रुग्णालयात 300 व्हेंटीलेटर उपलब्ध असून, आणखी 50 नवीन व्हेंटीलेटर दाखल होणार आहेत. जिल्ह्याचे जे 300 कोटीचे बजेट आहे, त्यापैकी 10 टक्के म्हणजे 30 कोटी निधी कोरोनावर खर्च करण्यात येत, असल्याची माहितीही यावेळी विश्वजित कदम यांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येणारी जागतिक मदत कुठे आहे?

दोन ऑक्सिजन प्लांटची निर्मिती

सध्याची आणि भविष्यातील ऑक्सिजनची गरज लक्षात घेऊन भारती विद्यापीठाच्या माध्यमातून पुणे आणि सांगली या दोन ठिकाणी भारती हॉस्पिटलच्या आवारात स्वतःचे ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारण्यात येणार असल्याची घोषणा मंत्री कदम यांनी यावेळी केली. प्रत्येकी साडेचार कोटींचे हे ऑक्सिजन निर्मिती प्लांट असून, त्यातून पर युनिट पंधराशे लिटर ऑक्सिजनची निर्मिती करण्यात येणार आहे. असेही यावेळी कदम यांनी म्हटले आहे.

जागतिक मदत कुठे चालली आहे ?

सध्या कोरोना परिस्थितीमध्ये जागतिक पातळीवरून मोठ्या प्रमाणात भारताला मदत होत आहे. ऑक्सिजन, रेमडेसिवीर,
लस, अशा अनेक पातळ्यांवर इतर देशातून भारताला मदत मिळत आहे, मात्र ही मदत कुठे जात आहे ? असा सवाल करत, महाराष्ट्र सध्या कोरोनाच्या गंभीर परिस्थितीतून जात असल्याने महाराष्ट्राला झुकते माप द्यायला हवं, असं मत मंत्री कदम यांनी यावेळी व्यक्त केल.

हेही वाचा -कोरोना नियंत्रणासाठी तामिळनाडूत दोन आठवड्यांचा लॉकडाऊन

ABOUT THE AUTHOR

...view details