सांगली - जिल्ह्यात एकूण ८ मतदार संघ आहेत. विधानसभा निवडणुकीत सांगली जिल्ह्यात चुरशीने 66.63 टक्के मतदान झाले. जिल्ह्यात २०१४ च्या निवडणुकीत भाजपने बाजी मारली होती. भाजपचे ४ आमदार निवडून आले होते. तर, राष्ट्रवादीचे २, काँग्रेसचे १, शिवसेनेचे १ आमदार निवडून आले होते. त्यावेळी भाजपचे वर्चस्व सांगली जिल्ह्यात निर्माण झाले आहे.
मतदार संघ निहाय २०१४ची स्थिती -
1) सांगली मतदार संघात २०१४ मध्ये सुधीर गाडगीळ (भाजप) विजयी झाले होते, त्यांनी मदन पाटील यांचा पराभव केला होता.
2) मिरज मतदार संघात २०१४ मध्ये सुरेश खाडे (भाजप) विजयी झाले होते, त्यांनी सिद्धेश्वर जाधव यांचा पराभव केला होता.
3) इस्लामपूर मतदार संघात २०१४ मध्ये जयंत पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस) विजयी झाले होते, त्यांनी अभिजीत पाटील यांचा पराभव केला होता.
4) शिराळा मतदार संघात २०१४ मध्ये शिवाजीराव नाईक (भाजप) विजयी झाले होते, त्यांनी मानसिंह नाईक यांचा पराभव केला होता.
5) पलुस-कडेगाव मतदार संघात २०१४ मध्ये पतंगराव कदम (काँग्रेस) विजयी झाले होते, त्यांनी पृथ्वीराज देशमुख यांचा पराभव केला होता.
6) खानापूर मतदार संघात २०१४ मध्ये अनिल बाबर (शिवसेना) ) विजयी झाले होते, त्यांनी सदाशिवराव पाटील यांचा पराभव केला होता.
7) तासगाव-कवठेमहांकाळ मतदार संघात २०१४ मध्ये सुमन आर. आर.पाटील (राष्ट्रवादी) विजयी झाल्या होत्या, त्यांनी अजित घोरपडे यांचा पराभव केला होता.
8) जत मतदार संघात २०१४ मध्ये विलासराव जगताप (भाजप) विजयी झाले होते, त्यांनी विक्रमसिंह सावंत यांचा पराभव केला होता.
सांगली जिल्ह्यातील निवडणूक रिंगणातील उमेदवार -