सांगली- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130व्या जयंतीनिमित्त इस्लापूर येथील संत रोहिदास चर्मकार युवा फाऊंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सांगलीत आंबेडकर जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन - रक्तदान शिबिराचे आयोजन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130व्या जयंतीनिमित्त इस्लापूर येथील संत रोहिदास चर्मकार युवा फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130व्या जयंतीनिमित्त इस्लामपूर येथील संत रोहिदास चर्मकार युवा फाऊंडेशनच्या वतीने आज रक्तदान शिबिराचे अजोजन इस्लामपूर मेडिकल असोशिएशन सभागृहात करण्यात आले होते. यामध्ये शंभर रक्तदात्यांनी सहभाग घेतला होता. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र रक्ताचा तुटवडा भासत आहे. बऱ्याच रक्तपेढींना रक्त पुरवठा कमी पडत आहे. याचा विचार करून आज संत रोहिदास चर्मकार युवा फाउंडेशनच्या सांगली जिल्हा अध्यक्ष श्रद्धा अतुल शिंदे, युवा अध्यक्ष अतुल बाबा शिंदे आणि कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
संत रोहिदास चर्मकार फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम व अन्यायकारक घटनांवर आवाज उठवून लोकांना न्याय मिळवून दिला आहे, तर रुग्णालयांच्या मनमानी बिलांवर अंकुश ठेवण्याचे काम हे फाऊंडेशन करत आहे. याचा अनेकांना फायदा झालेला आहे. सध्या कोरोनाच्या काळात रक्तपुरवठा कमी पडू नये, यासाठी या संघटनेने रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. अशी माहिती महिला अध्यक्ष श्रद्धा अतुल शिंदे यांनी दिली. यावेळी रक्तदात्यांना चहा नाष्ट्याची सोय करण्यात आली होती. तर प्रत्येकी टर्किशस टॉवेल भेट म्हणून देण्यात आले. यावेळी सांगली जिल्हा अध्यक्ष निशांत बुरूटे, सांगली जिल्हा सचिव संभाजी कांबळे, जिल्हा युवा उपाध्यक्ष राजकुमार वाकळे, शिराळा तालुका अध्यक्ष उमेश कारंडे, शिराळा तालुका युवा अध्यक्ष रणजीत बागडे, शिराळा तालुका कार्याध्यक्ष पांडुरंग कांरडे, वाळवा तालुका अध्यक्ष संतोष चौधरी, अविनाश चौधरी, उत्तम कारंडे, बापू कारंडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.