महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

काँग्रेसच्या व्यासपीठावरून माजी मंत्री विश्वजीत कदमांसह काँग्रेस नेत्यांना भाजपात येण्याची खुली ऑफर

Sanjaykaka Patil: भाजपाचे खासदार संजयकाका पाटील MP Sanjaykaka Patil यांनी काँग्रेस आमदार विश्वजित कदमांसह MLA Vishwajit Kadam जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांना भाजपामध्ये येण्याचे जाहीर निमंत्रण दिले आहे. विशेष म्हणजे काँग्रेसच्यावतीने आयोजित समारंभा दरम्यानचं ही ऑफर दिली आहे.

Sanjaykaka Patil
Sanjaykaka Patil

By

Published : Oct 16, 2022, 8:00 PM IST

सांगलीभाजपाचे खासदार संजयकाका पाटील MP Sanjaykaka Patil यांनी काँग्रेस आमदार विश्वजित कदमांसह MLA Vishwajit Kadam जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांना भाजपामध्ये येण्याचे जाहीर निमंत्रण दिले आहे. विशेष म्हणजे काँग्रेसच्यावतीने आयोजित समारंभा दरम्यानचं ही ऑफर दिली आहे. यामुळे उपस्थितांच्या भुवया उंचावला, तर खासदारांच्या ऑफरमुळे विश्वजीत कदम भाजपमध्ये जाणार का ? या चर्चेला आता उधान येणार आहे.

काँग्रेस नेत्यांना भाजपात येण्याची खुली ऑफर

भाजपामध्ये येण्याची खुली ऑफरसांगली शहरातील शासकीय रुग्णालया शेजारी असणाऱ्या चौकाला स्वर्गीय पतंगराव कदम, असे नाव देण्यात आले आहे. या नामफलकाचे उद्घाटन कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते संपन्न झाले आहे. यावेळी भाजपाचे खासदार संजयकाका पाटील, काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांच्यासह इतर काँग्रेस नेत्यांच्या उपस्थित होते. यावेळी या नामकरण सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित सभेत बोलताना खासदार संजयकाका पाटील यांनी व्यासपीठावर असणारे काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांना थेट भाजपामध्ये येण्याची खुली ऑफर दिली आहे.

खासदार संजयकाका पाटील म्हणालेदेशात कुठे चाललाय याचं भान ठेवून विश्वजीत कदम, आमदार विक्रम सावंत, विशाल पाटील, जयश्री पाटील आणि पृथ्वीराज पाटील यांनी आपल्या सोबत येण्याचा विचार करावा, अश्या शब्दात व्यासपीठावरून उपस्थित सर्व काँग्रेस नेते मंडळींना काँग्रेसच्या व्यासपीठावरून भाजपात येण्याची खुली ऑफर दिली आहे.

विलासराव जगताप यांचा इशारा त्याचबरोबर आता हे बोलल्याने, माझे हितशत्रू अधिक जागरुक होतील, पण घाबरणार संजयकाका पाटील कसला. दोन हात करने आपला स्वभाव आहे. त्यामुळे मी कशाची काळजी करत नाही. अश्या शब्दात भाजपाचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी अप्रत्यक्ष इशारा देखील दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details