महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कर्नाटकमधून सांगली जिल्ह्यासाठी सुरू असलेला ऑक्सिजनचा पुरवठा थांबला - सांगलीत ऑक्सीजनचा होऊ शकतो तुटवडा

कर्नाटकाच्या बेल्लारी मधून 10 टन ऑक्सिजनचा पुरवठा सांगली जिल्ह्यासाठी सुरू होता. मात्र ऑक्सीजन पुरवठा आजपासून बंद करण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यातील टँकर कर्नाटकमधून रिकामा परतला आहे, अशी माहिती औषध प्रशासन अधिकारी नितीन भांडारकर यांनी दिली आहे

Ongoing supply of oxygen
ऑक्सिजनचा पुरवठा थांबला

By

Published : May 6, 2021, 7:50 PM IST

सांगली- कर्नाटक राज्यातून सांगली जिल्ह्यासाठी सुरू असलेला ऑक्सिजनचा पुरवठा थांबला आहे. कर्नाटकाच्या बेल्लारी मधून 10 टन ऑक्सिजनचा पुरवठा जिल्ह्यासाठी सुरू होता. मात्र ऑक्सीजन पुरवठा आजपासून बंद करण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यातील टँकर कर्नाटकमधून रिकामा परतला आहे, अशी माहिती औषध प्रशासन अधिकारी नितीन भांडारकर यांनी दिली आहे.

बेल्लारीचा ऑक्सिजन पुरवठा थांबला...

सांगली जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्येमध्ये वाढ होत आहे.परिणामी ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण होत आहे. जिल्ह्याला सध्या 43 टन ऑक्सिजनची गरज आहे आणि ती वाढत आहेत. सांगली जिल्ह्याला पुणे आणि कर्नाटकच्या बेल्लारी या ठिकाणाहून ऑक्सिजन पुरवठा होता. मात्र आता कर्नाटक राज्यातुन सुरू असलेला ऑक्सिजनचा पुरवठा बंद झालेला आहे. कर्नाटकमधून सांगलीसाठी देण्यात येणारा ऑक्सिजनचा पुरवठा केंद्र सरकारने थांबवलेला आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यात बेल्लारी येथून मिळणारा 10 टन ऑक्सिजन बंद झाला आहे.

बेल्लारीचा ऑक्सिजन पुरवठा थांबला...

ऑक्सिजन उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न...

याबाबत अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त नितीन भांडारकर म्हणाले, सध्या 43 टन इतक्या ऑक्सिजनची जिल्ह्याची गरज आहे. जेमतेम ऑक्सिजन पुरवठा सुरू आहे. ज्यामध्ये बेल्लारी वरून 10 टन ऑक्सिजन पुरवठा सुरू होता. मात्र आता तो बुधवार पासून बंद करण्यात आला आहे. याबाबत वरिष्ठ पातळीवर कल्पना देण्यात आलेली आहे.आणि कमी पडणाऱ्या ऑक्सिजन बाबत पुणे व मुंबई मधून ऑक्सीजन उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ऑक्सिजन पुरवठा खंडित होऊ नये यासाठी पूर्ण दक्षता घेण्यात येत आहे, असा विश्वास भांडारकर यांनी व्यक्त केला आहे.

ऑक्सिजन अभावी मृत्यू संख्या वाढण्याची भिती...

मात्र दुसर्‍या बाजूला जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे. परिणामी ऑक्सिजनचा ही कमतरता भासत आहे आणि संभाव्य वाढ आणि ऑक्सिजनचा होणारा तुटवडा पाहता ऑक्सिजन अभावी मृत्यूची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा - सुरेश रैनाने मुख्यमंत्री योगींकडे मागितले ऑक्सिजन सिलिंडर; सोनू सूदने दिले उत्तर

ABOUT THE AUTHOR

...view details