महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुलाला पोहणे शिकवण्यासाठी गेलेल्या वडिलांचा विहिरीत बुडून मृत्यू - शोध मोहिम

मुलाला पोहायला शिकवण्यासाठी गेलेल्या वडिलांचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. अमित वाघ (३७) असे मृत वडिलांचे नाव आहे. तासगावच्या बलगवडेमध्ये ही घटना घडली.

मुलाला पोहणे शिकवण्यासाठी गेलेल्या वडिलांचा विहिरीत बुडून मृत्यू

By

Published : May 5, 2019, 12:06 AM IST

सांगली- मुलाला पोहायला शिकवण्यासाठी गेलेल्या वडिलांचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. अमित वाघ (३७) असे मृत वडिलांचे नाव आहे. तासगावच्या बलगवडेमध्ये ही घटना घडली.

मुलाला पोहणे शिकवण्यासाठी गेलेल्या वडिलांचा विहिरीत बुडून मृत्यू

अमित वाघ हे आपल्या लहान मुलाला पोहणे शिकवण्यासाठी बलगवडे येथे गेले होते. यावेळी मुलाला पोहण्याचे शिकवत असताना अचानक ते विहिरीत पडले. सुमारे ४०-५० फूट खोल विहीर असल्याने ते तळात गेले. यावेळी तिथे असणाऱ्या वाघ यांच्या नातेवाईकांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ते सापडले नाही.

त्यानंतर ही माहिती तासगाव पोलिसांना दिले असता पोलिसांनी रेस्क्यू पथकासह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिसांनी शोध मोहीम राबवत मृतदेह बाहेर काढला. दरम्यान, अमित वाघ हे वहिरीत नेमके कसे पडले आणि त्यांचा मृत्यू कसा झाला ? हे अद्याप समजू शकलेले नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details