सांगली - शिराळ्याच्या निगडीमधील कोरोनाबाधित तरुणीच्या आईलाही कोरोनाची लागण झाली आहे. शनिवारी रात्री तिच्या आईचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता २ वर पोहोचली आहे. तर कोरोनाबाधित तरुणीच्या संपर्कातील भावासह ११ जणांचे रिपोर्ट हा निगेटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली.
कोरोनाबाधित तरुणीच्या आईलाही कोरोनाची लागण - corona update in sangali
शिराळ्याच्या निगडीमधील कोरोनाबाधित तरुणीच्या आईलाही कोरोनाची लागण झाली आहे. शनिवारी रात्री तिच्या आईचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
सांगलीच्या शिराळा तालुक्यातील निगडी येथे मुंबईहून आलेल्या एका तरुणीला शुक्रवारी कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. १६ एप्रिल रोजी ती आपल्या भावासह संचारबंदी असताना देखील आपल्या गावी पोहोचली होती. यानंतर त्या तरुणीला त्रास होऊ लागल्याने इस्लामपूरच्या एका रुग्णालयात उपचार सुरू असताना कोरोनाची लक्षणे आढळल्याने तिला व तिच्या भावाला मिरजेच्या कोरोना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर तरुणीचा कोरोना रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला होता. यानंतर प्रशासनाने त्या तरुणीच्या जवळच्या संपर्कातील १२ जणांना क्वारंटाईन करत स्वॅब टेस्ट घेतल्या होत्या. यामध्ये शनिवारी दुपारी आणि सायंकाळी ११ जणांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आले. मात्र, कोरोनाबाधित तरुणीच्या आईचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने सांगलीकरांची चिंता वाढली आहे.
सांगली जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही आता २ वर पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आधीच शिराळा तालुक्यात आणि विशेषतः निगडी गावात मोठी खबरदारी घेतली आहे.