सांगली- मुंबईहून सांगलीच्या कवठेमहांकाळमधील दुधेभावी याठिकाणी पोहचलेल्या एका व्यक्तीला गुरुवारी कोरोना लागण झाली होती. त्याच्या पत्नीलादेखील कोरोना लागण झाल्याचे समोर आले आहे. त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या २८ पैकी २५ जणांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये कोरोना बाधिताच्या एका मुलाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे, तर एकाचा अहवाल अजून मिळालेला नाही. मात्र, त्याच्या पत्नीचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला असून सांगलीचा बाधितांचा आकडा ५ वर पोहचला आहे.
सांगलीच्या कवठेमंकाळ येथील दुधेभावीमध्ये मूळच्या वाळवा तालुक्यातील निपाणी येथील तर सध्या मुंबईच्या मानखुर्द या ठिकाणी वास्तव्यास असणारा भाजीपाला विक्रेता हा २७ एप्रिल रोजी आला होता. पत्नी व दोन मुलांसह एका वाहनातून चोरुन सोलापूर मार्गे दुधेभावी या आपल्या मामाच्या गावी पोहचला होता. त्यानंतर २८ एप्रिलला जिल्हा परिषदेच्या फिवर क्लिनिक तपासणीमध्ये त्याला कोरोनाची लक्षणे आढळली होती. त्यानंतर तातडीने प्रशासनाने त्यला ताब्यात घेऊन मिरजच्या आयसोलेशन कक्षात दाखल केले होते.गुरुवारी त्याचा अहवाल प्राप्त झाला आणि त्याला बाधा झाल्याचे स्पष्ट झाले.
मुंबईहून दुधेभावीत पोहचलेल्या कोरोनाबाधिताच्या पत्नीलाही लागण - sangali corona news
त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या २८ पैकी २५ जणांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये कोरोना बाधिताच्या एका मुलाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे, तर एकाचा अहवाल अजून मिळालेला नाही.
त्यानंतर प्रशासनाने अधिक गतीने काम करत, त्या कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कातील पत्नी मुलांसह दुधेभावी, कुपवाडच्या बामणोली आणि त्याच्या मुळगाव असणाऱ्या येडेनिपाणी येथील २८ जणांना क्वारंटाईन करून स्वॅब घेतले होते. त्यापैकी २६ जणांचे अहवाल आज प्रशासनाला प्राप्त झाले असून यामध्ये कोरोनाबाधित व्यक्तीच्या पत्नीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर त्याच्या एका मुलासह २५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. एका मुलासह दोघांचे अहवाल प्रतीक्षेत असल्याचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी सांगितले आहे .
तर मुंबईच्या मानखुर्द वरून पोहोचलेल्या त्या कोरोना बधिताच्या पत्नीलाही कोरोना लागण झाल्याने आता सांगलीचा कोरोना आकडा ५ वर पोहचला आहे.