महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'मॉर्निंग वॉक'साठी गेलेल्या व्यक्तीचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू - सांगली जिल्हा बातमी

बाबासो पाटील हे नित्याप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी घरातून पहाटे 4 वाजता निघाले होते. दरम्यान, कोल्हापूर रोडवरील हॉटेल उदयनजीक एका अज्ञात वाहनाने पाटील यांना धडक दिली.

One killed in accident in Sangli
सांगली

By

Published : Jan 18, 2020, 4:54 PM IST

सांगली- मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका व्यक्तीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. बाबासो पाटील (वय 65) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सांगलीच्या कोल्हापूर रोडवर पहाटेच्या दरम्यान ही घटना घडली.

बाबासो पाटील हे नित्याप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी घरातुन पहाटे 4 वाजता निघाले होते. दरम्यान, कोल्हापूर रोडवरील हॉटेल उदयनजीक एका अज्ञात वाहनाने पाटील यांना धडक दिली. या धडकेने पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. मृत पाटील हे अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे जवळचे नातेवाईक आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details