महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Cocaine Smuggling : कोकेन तस्करी करताना परदेशी तरुणाला अटक; 16 लाखांचे 164 ग्रॅम कोकेन जप्त - कोकेन तस्करी परदेशी तरुणाला अटक

इस्लामपूर नजीकच्या पुणे-बंगळुरु महामार्गावरील पेठनाका येथे एका खासगी ट्रॅव्हल्स बसमधून प्रवास करणाऱ्या परदेशी तरुणाकडून 16 लाख 30 हजार रुपये किंमतीचे कोकेन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. तसेच एडवर्ड जोसेफ इदेह या नायजेरियन तरुणाला अटक करण्यात आली आहे. ( Islampur Police Arrested One Over Cocaine Smuggling )

one foreign youth arrested by islampur police over cocaine smuggling
कोकेन तस्करी करताना परदेशी तरुणाला अटक

By

Published : Dec 28, 2021, 5:51 AM IST

सांगली - पुण्याहून बंगळुरुकडे एक खासगी ट्रॅव्हल्स निघाली असून यामध्ये कोकेन घेऊन एक परदेशी तरुण जात असल्याची माहिती इस्लामपूर पोलिसांना मिळाली. त्यानुसार इस्लामपुराच्या पेठे येथे पुणे-बंगळुरू महामार्गावर तब्बल 16 लाखांचे कोकेन जप्त करण्यात आली आहे. 164 Gram Cocaine Seized ) तसेच कोकेन तस्करी करताना एडवर्ड जोसेफ इदेह या नायजेरियन तरुणाला अटक करण्यात आली आहे. इस्लामपूर पोलिसांची एका महिन्यात ही दुसरी कारवाई आहे. ( Islampur Police Arrested One Over Cocaine Smuggling )

कोकेन तस्करी करताना परदेशी तरुण अटक -

इस्लामपूर नजीकच्या पुणे-बंगळुरु महामार्गावरील पेठनाका येथे एका खासगी ट्रॅव्हल्स बसमधून प्रवास करणाऱ्या परदेशी तरुणाकडून 16 लाख 30 हजार रुपये किंमतीचे कोकेन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. एडवर्ड जोसेफ इदेह वय-35, मुळ रा . नायजेरिया,सध्या रा. बंगळुरू याला इस्लामपूर पोलिसांनी अटक केली. पेठनाका येथील हॉटेल मानिकंडन हॉटेल येथे इस्लामपूर पोलिसांनी सापळा रचून बसमधून उतरणाऱ्या एडवर्ड जोसेफ इदेह याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे हे सोळा लाखांचे 164 ग्रॅम कोकेन आढळून आले.

हेही वाचा -Anil Deshmukh Judicial Custody : अनिल देशमुखांना दिलासा नाहीच; 10 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी वाढ

महिन्याच्या अंतरात कोकेन विरोधात दुसरी कारवाई -

25 नोव्हेंबरला पहाटेच्या पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाघवाडी फाटा येथे बसने मुंबई ते बंगळुरू प्रवास करताना 11 लाख रुपयांच्या कोकेनसह टांझानियाच्या तरुणास पोलिसांनी जेरबंद केले होते. त्याच्याकडे 109 ग्रॅम कोकेन मिळाले होते. दरम्यान, एका महिन्याच्या अंतरात हा दुसरा परदेशी तरुण कोकेन घेऊन जाताना पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details