सांगली- येथील पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील येलूर फाट्यावर एसटी बसने पाठीमागून धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. ही गाडी महाबळेश्वरहून कोल्हापूरला जात होती. बजरंज पाटील असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील येलूर फाट्यावर बसने पाठीमागून धडक दिल्याने एकाच मृत्यू - सांगली अपघात बातमी
बजरंग श्रीपती पाटील यांचे गाडीवरुन पडून रस्त्याच्या दुभाजकावर डोके आदळले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. कुरळप पोलिसात बस चालक सादिक बादशहा नदाफ, कोल्हापूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा-मुख्यमंत्री हे मैदानातून पळ काढलेले पैलवान - विजय वडेट्टीवार
वाळवा तालुक्यातील येलूर येथील बजरंग श्रीपती पाटील (वय 78) हे राष्ट्रीय महामार्गाजवळील साई पेट्रोल पंपावरुन बजाज एम 80 (गाडी क्र.एम एच 09.एन 485) मध्ये पेट्रोल भरुन येलूर गावाकडे जात होते. दरम्यान, पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या कोल्हापूर संभाजीनगर डेपोची (क्र.एम एच14 बीटी 4032) बसने जोराची धडक दिली. यात बजरंग श्रीपती पाटील यांचे गाडीवरुन पडून रस्त्याच्या दुभाजकावर डोके आदळले. त्यांचा जागीच मृत्यू झाला. बस चालक सादिक बादशहा नदाफ, कोल्हापूर यांच्यावर कुरळप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस सूर्यकांत कुंभार करत आहेत.