महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुणे-बंगळुरू महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाच मृत्यू, दोन जखमी - yelure naka sangli accident

रोहित काळे हा प्रज्वल शिंदेबरोबर पुणे-बेंगलुरू महामार्गावरील येलूर फाट्याजवळील साई पेट्रोलपंपावर पेट्रोल भरून आपल्या गावाकडे जात होता. दरम्यान, एका ठिकाणी मार्गालगत गाडी थांबून तो संघराज काळे या व्यक्तीबरोबर बोलत होता. यावेळी पुण्याहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने रोहितला पाठीमागून जोराची धडक दिली. या घटनेत रोहितचा मृत्यू झाला.

sangli
अपघात

By

Published : Jan 2, 2020, 11:13 PM IST

सांगली- अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू तर दोन जण जखमी झाल्याची घटना पुणे-बंगलुरू महामार्गवरील येलूर फाट्याजवळ घडली. ही घटना आज सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास घडली. रोहित काळे असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

रोहित काळे हा प्रज्वल शिंदेबरोबर पुणे-बंगळुरू महामार्गावरील येलूर फाट्याजवळील साई पेट्रोलपंपावर पेट्रोल भरून आपल्या गावाकडे जात होता. दरम्यान, एका ठिकाणी मार्गालगत गाडी थांबून तो संघराज काळे या व्यक्तीबरोबर बोलत होता. यावेळी पुण्याहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या आज्ञात वाहनाने रोहितला पाठिमागून जोराची धडक दिली. या घटनेत रोहितचा जागीच मृत्यू झाला. तर, रोहितच्या पाठिमागे बसलेला प्रज्वल शिंदे व पादचारी संघराज काळे हे जखमी झाले. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात वाहन व चालकाविरुद्ध गुन्हा नोंद केला असून पुढील तपास स.पो.नि अरविंद काटे करत आहे.

हेही वाचा-महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या तयारीचा आढावा, पाहा ईटीव्ही भारतसोबत...

ABOUT THE AUTHOR

...view details