सांगली :शिराळा रोडवरील रेठरेधरण या ठिकाणी झालेल्या भीषण अपघातामध्ये एक जण ठार झाला (Car Accident In Sangli) आहे. तर तीन जखमी झाले आहेत. तर वाहनांच्या समोरा-समोर झालेल्या धडकेनंतर पलटी झालेल्या एका गाडीने पेट घेतला आणि ज्यामध्ये गाडी जळून खाक झाली (accident car burnt) आहे.
Car Accident In Sangli : दोन कारच्या धडकेत एक जण ठार, तिघे जखमी ; अपघातानंतर गाडी जळून खाक - कारच्या धडकेत एक जण ठार
दोन कारचा शिराळा रोडवरील रेठरेधरण या ठिकाणी भीषण अपघात (Car Accident In Sangli) झाला. दोन कारच्या समोरासमोर धडकेत एक जण ठार व तिघे जखमी झाले (accident car burnt) आहेत. अपघातानंतर गाडी जळून खाक झाली (one death three injured in car accident) आहे.
दोन कारचा अपघात :पेठ ते शिराळा या राज्यमार्गावर एस के इंटरनॅशनल स्कूल रेठरे धरण येथील शाळेसमोर दोन कारचा समोरासमोर अपघात झाला. कारचालक संदीप आनंदा शेवाळे (वय 42) यांचा जागीच मृत्यू झाला. तर यामध्ये त्यांच्यासोबत असणाऱ्या त्यांच्या पत्नी दिपाली शेवाळे व चार वर्षाचा मुलगा श्रीराज आणि 10 वर्षाची मुलगी आराध्या असे तिघेजण जखमी झाले (one death three injured in car accident) आहेत.
गाडीची जोरदार धडक : शेवाळे कुटुंब हे शिराळ्याहुन इस्लामपुरकडे निघाले (car accident) होते. त्याचवेळी समोरून आलेल्या एका भरधाव चार चाकी गाडीची आणि शेवाळे यांच्या गाडीची जोरदार धडक झाली. अपघातामध्ये शेवाळे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातातील दुसरी चारचाकी गाडी ही रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली. या गाडीने अचानक पेट घेतला. ज्यामुळे लागलेल्या भीषण आगीत गाडी जळून खाक झाली (accident in sangli) आहे.