महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

टेम्पोची धडक बसल्याने पादचाऱ्याचा जागीच मृत्यू - police

मंगेश राजाराम बामणे यांचा रिक्षाचा व्यवसाय होता. ते स्टँडवरून दीनानाथ चौकतून शिवाजी पुतळा परिसराकडे निघाले होते. या दरम्यान एसके कम्युनिकेशन समोर आयशर टेम्पो (क्रमांक एमएच १७ एजी ४६७८) या टेम्पोचा धक्का मंगेश यांना लागला. या अपघातात मंगेश हे टेम्पोच्या मागील चाकाखाली सापडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

सांगली

By

Published : Mar 15, 2019, 12:11 PM IST

सांगली - शहरातील एसटी स्टँडजवळील भागात रस्त्यावरून जाताना टेम्पोची धडक लागून एका पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. मंगेश राजाराम बामणे (वय ३५) असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. बामणे हे रीक्षाचालक होते. ही घटना गुरुवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

मंगेश राजाराम बामणे यांचा रिक्षाचा व्यवसाय होता. ते स्टँडवरून दीनानाथ चौकतून शिवाजी पुतळा परिसराकडे निघाले होते. या दरम्यान एसके कम्युनिकेशन समोर आयशर टेम्पो (क्रमांक एमएच १७ एजी ४६७८) या टेम्पोचा धक्का मंगेश यांना लागला. या अपघातात मंगेश हे टेम्पोच्या मागील चाकाखाली सापडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातानंतर काही अंतरावर जावून टेम्पो चालकाने गाडी थांबवत शहर पोलीस ठाणे गाठले.

या घटनेची माहिती मिळताच सांगली शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुरेश चव्हाण व पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी शववाहिका मागवून मृतदेह शव विच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवून दिला. मृत मंगेश बामणे यांनी काही दिवसांपूर्वीच कुटुंबानी नवीन रिक्षा घेऊन दिली होती. अपघातानंतर मंगेशच्या नातेवाईक आणि मित्र परिवाराने घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील टेम्पो चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास सांगली शहर पोलीस करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details