महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खाऊ आणण्यासाठी गेलेल्या चिमुरड्यांवर काळाचा घाला; टेम्पोच्या धडकेत एक ठार एक जखमी - sangli accident news

मिरज शहरातल्या कोल्हापूर रस्त्यावरील असणाऱ्या रेल्वे उड्डाण पुलाच्या हद्दीत एक भटक्या जमातीचा तांडा वास्तव्यास आहे. या तांड्यातील दोन लहान मुलं रस्ता ओलांडत असताना भरधाव टेम्पोने त्यांना धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की एकाच जागीच मृत्यू झाला.

टेम्पोच्या धडकेत चिमुरडा जागीच ठार
टेम्पोच्या धडकेत चिमुरडा जागीच ठार

By

Published : Apr 26, 2021, 10:33 PM IST

सांगली- मिरज शहरामध्ये टेम्पोच्या अपघातामध्ये एक बालक ठार तर एक बालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या अपघातानंतर संतप्त जमावाने टेम्पोवर तुफान दगडफेक केली. आर्यन कुंचीकोरव (वय 8 वर्ष) असे मृत झालेल्या चिमुरड्याचे तर रोहित शिंदे (वय 7 वर्ष) असे जखमी झालेल्या बालकाचे नाव आहे.

टेम्पोच्या धडकेत चिमुरडा ठार
मिरज शहरातल्या कोल्हापूर रस्त्यावरील असणाऱ्या रेल्वे उड्डाण पुलाच्या हद्दीत एक भटक्या जमातीचा तांडा वास्तव्यास आहे. या तांड्यातील दोन लहान मुलं रस्ता ओलांडत असताना भरधाव टेम्पोने त्यांना धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की एकाच जागीच मृत्यू झाला.

खाऊ घेऊन रस्ता ओलांडताना अपघात
आर्यन आणि रोहित हे दोघेही आपल्या झोपडीमधून खाऊ आणण्यासाठी रस्त्याच्या पलीकडे गेले होते. खाऊ घेऊन ते पुन्हा आपल्या झोपड्यांमध्ये परतण्यासाठी रस्ता ओलांडत होते. यावेळी कोल्हापूर रस्त्यावरील शास्त्री चौकच्या दिशेने आलेल्या व कोल्हापूरकडे जाणाऱ्या भरधाव टेम्पोने या दोघांनाही जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दोघेही उडून पडले. त्यानंतर त्या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांनी आणि आर्यन व रोहितच्या नातेवाईकांनी दोघांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र यापैकी आर्यन याचा मृत्यू झाल्याचे समोर आले. दरम्यान त्याच्या मृत्यूची माहिती मिळताच तांड्यातील आणि परिसरातील संतप्त नागरिकांनी जोरदार दगडफेक करत टेम्पोच्या दर्शनी भागाच्या काचा फोडून टाकल्या. तर अपघातानंतर चालकाने काढला होता. अपघातानंतर घटनास्थळी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत पंचनामा करत अपघात प्रकरणी टेम्पो चालका विरोधात मिरज शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details