महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील न झाल्याने दोघांना बेदम मारहाण; 14 जणांविरोधात गुन्हा दाखल - व्हॉट्सअप ग्रुपवरून भांडण

व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होण्यास नकार दिल्याने दोघांना बेदम मारहाण केल्याचा प्रकार विटा येथे समोर आला आहे. याप्रकरणी 14 जणांच्या विरोधात विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होण्यास नकार दिल्याने दोघांना बेदम मारहाण केल्याचा प्रकार

By

Published : Nov 21, 2019, 11:18 AM IST

सांगली- व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होण्यास नकार दिल्याने दोघांना बेदम मारहाण केल्याचा प्रकार विटा येथे समोर आला आहे. याप्रकरणी 14 जणांच्या विरोधात विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

प्रविण साठे या व्यक्तीने 'राजे' नावाचा व्हॉट्सअप ग्रुप सुरू केला. या ग्रुपमध्ये प्रविणने त्याचा मित्र आकाश भस्मे सहभागी होण्यास सांगितले होते. मात्र, आकाशने ग्रुपमध्ये सामील होण्यास नकार दिला. याचा राग मनात धरून प्रविण साठे व त्याच्या मित्रांनी आकाशला 15 नोव्हेंबरला रस्त्यात अडवून शिवीगाळ करून मारहाण केली.

यानंतर आकाशने त्याच्या वडिलांना सर्व घटनाक्रम सांगितल्यानंतर वडील संतोष भस्मे यांनी पोलीस ठाण्यात प्रविण साठेसह त्याच्या 14 मित्रांविरोधात तक्रार दिली.

गुन्हा नोंदवल्यानंतर घरी परतणाऱ्या आकाशला संबंधितांनी पुन्हा गाठून बेदम मारहाण केली. आम्ही देखील तुझ्याविरोधात अॅट्रॉसिटीचा खटला दाखल करून तुझे करिअर खराब करू, अशी धमकी दिल्याची फिर्याद संतोष भस्मे यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details