सांगली -सांगली शहरात उपजिल्हाधिकारी महिला अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. हर्षलता गेडाम ( Knife in hand Harshalata Gedam ) असे त्त्यांचे नाव आहे. त्या सकाळी जॉगिंगसाठी गेल्या असता त्यांच्यावर अज्ञाताने चाकू हल्ला केला. गेडाम यांच्या हातावर चाकूचा वार झाला आहे. याबाबत हर्षलता गेडाम यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
गेडाम यांचा जोरदार प्रतिहल्ला-सांगली शहरातल्या विश्रामबागच्या नेमिनाथनगर या ठिकाणी असणाऱ्या कल्पद्रुम क्रीडांगणावर पहाटेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी असणाऱ्या हर्षलता गेडाम या महिला अधिकार्यावर दोघा अज्ञात हल्लेखोरांनी चाकूने हल्ला ( Unidentified assailants attacked ) केल्याचा प्रकार घडला आहे. नेहमीप्रमाणे हर्षलता गेडाम पहाटे पाचच्या सुमारास जॉगिंग करण्यासाठी ग्राऊंडवर गेल्या होत्या. जॉगिंग सुरू असताना मोटर सायकल वरून दोघे अज्ञात, त्या ठिकाणी पोहोचले. त्यापैकी एकाने हर्षलता गेडाम यांना, चालतेस, का? असं, विचारत त्यांना ओढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गेडाम यांनी दोघा हल्लेखोरांपैकी एकावर लाथेने प्रहार करत एकास खाली पाडले. गेडाम यांनी जोरदार प्रतिहल्ला केल्याने दोघांनी पळ काढला. मात्र, यादरम्यान त्यांना हातावर चाकू लागल्याने त्या किरकोळ जखमी झाल्या आहेत.