सांगली- सांगलीच्या महापुरात ४ दिवसांपासून अडकलेल्या एका वृद्धाचा आज मृत्यू झाला. लिंगापा हाण्डगी (वय ७४ )असे या वृद्धाचे नाव आहे. वेळेत औषधोपचार न मिळू शकल्याने मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
सांगलीच्या महापुरात अडकलेल्या वृद्धाचा मृत्यू; वेळेत औषधोपचार न मिळाल्याचा नातेवाईकांचा आरोप - हरिपूर
सांगलीच्या महापुरात ४ दिवसांपासून अडकलेल्या एका वृद्धाचा आज मृत्यू झाला. लिंगापा हाण्डगी (वय ७४ )असे या वृद्धाचे नाव आहे. वेळेत औषधोपचार मिळू न शकल्याने मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
सांगलीच्या महापुरात अडकून वृद्धाचा मृत्यू
मागील ५ दिवसापासून सांगली कृष्णा काठाला महापुराचा विळखा पडला आहे. यामध्ये अद्यापही हजारो लोक अडकून आहेत. हे लोक मदतीपासून वंचित असून यामुळे त्यांचा जीव जात आहे. दरम्यान, लिंगापा हाण्डगी या वृद्धाचा पुरात अडकून पडल्याने मृत्यू झाला आहे. सांगलीच्या हरिपूर रोडवरील बागेतील गणपती नजीकच्या अपार्टमेंटमध्ये हे कुटुंब अडकून होते. केवळ औषध वेळेत मिळाले नसल्याने या वृद्धाचा जीव गेल्याचे नातेवाईकांकडून आरोप करण्यात येत आहे.