सांगली -जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव वाढत आहे. गेल्या 8 दिवसांपासून हजारांच्यावर असणारी रुग्णसंख्या गुरुवारी 2 हजारच्या पुढे गेली होती. एका दिवसात तब्बल 2 हजार 328 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. शुक्रवारी ही वाढ कायम आहे. सलग दुसऱ्या दिवशी उच्चांकी रुग्ण संख्येची नोंद झाली आहे. दोन दिवसांपासून जिल्ह्यातील रुग्ण संख्या ही 2 हजाराच्या पुढे गेल्याने प्रशासन हादरून गेले आहे. तर शुक्रवारी एकाच दिवसात 45 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
अशी आहे आकडेवारी -