महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

एनआरसी विरोधात एनएसयुआयचा सांगलीत मशाल मोर्चा

एनआरसी व कॅब विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आणि त्यांना झालेल्या मारहाणीचा निषेध करण्यासाठी सांगलीत एनएसयुआय विद्यार्थी संघटनेच्या वतीने मशाल मोर्चा काढला. या वेळी शेकडो विद्यार्थी पेटत्या मशाली घेऊन मोर्चात सहभागी झाले होते.

By

Published : Dec 20, 2019, 11:10 PM IST

nsuis-march-aganst-nrc
एनआरसी विरोधात एनएसयुआयचा सांगलीत मशाल मोर्चा

सांगली -एनआरसी व कॅब विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आणि त्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज सांगली मध्ये काँग्रेसच्या एनएसयुआय विध्यार्थी संघटनेच्या वतीने मशाल मोर्चा काढला. लखनऊ आणि दिल्लीत विद्यार्थ्यांना मारहाण करण्याच्या घटना घडल्या याला विरोध करण्यासाठी सांगली जिल्हा विद्यार्थी काँग्रेसकडून हे आंदोलन करण्यात आले.

एनआरसी विरोधात एनएसयुआयचा सांगलीत मशाल मोर्चा

हेही वाचा -NRC व CAB विरोधात मिरजेत निघाला लक्षवेधी सर्वधर्मीय मोर्चा

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक विरोधात देशभरात सुरू असलेल्या आंदोलना दरम्यान विद्यार्थ्यांच्यावर करण्यात आलेल्या लाठीहल्लाच्या निषेधार्थ आज सांगली मध्ये काँग्रेसच्या एनएसयुआय विध्यार्थी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. मशाल मोर्चा काढत दिल्ली आणि लखनऊ येथील जमिया आणि अलिगढ विद्यापीठातील विध्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीचा निषेध करण्यात आला. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर शांततेच्या मार्गाने लोकशाही पद्धतीने आंदोलन सुरू असताना मोदी सरकार हिंसक मार्गाने आंदोलन दडपण्याचे काम करत असल्याचा आरोप सांगली जिल्हा विद्यार्थी काँग्रेस कडून करण्यात आला. त्याचा निषेध नोंदवण्यासाठी सांगली शहरात आज मशाल मोर्चा काढण्यात आला. यावेळी शेकडो विद्यार्थ्यांनी पेटत्या मशाली घेऊन या मोर्चात सहभाग नोंदवला होता. नागरिकत्व दुरुस्ती विधेयका विरोधात आंदोलन कारणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोबत काँग्रेसची एनएसयुआय ही संघटना असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

हेही वाचा - मोबाईल चोर टोळीचा पर्दाफाश, दोघांना अटक

ABOUT THE AUTHOR

...view details