सांगली - देशात परिस्थिती वेगळी होत आहे. देशात धर्माच्या नावाने लोकांच्यात अंतर निर्माण केले जातेय. त्यामुळे सामाजिक ऐक्य धोक्यात आल्याची चिंता राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. तसेच ज्यानी स्वातंत्र्य चळवळीत मोलाचे योगदान दिले, त्यांच्यावर दुर्दैवाने टीका करणारे नेतृत्व देशात असल्याची खंतही शरद पवार यांनी व्यक्त केली. शेजारच्या राज्यात अल्पसंख्याक समुदायातील लोकांच्या दुकानातून साहित्य घेऊ नका, असा चूकीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता धर्मांध वृत्तीच्या विरोधात लढाई करावी लागेल, असे आवाहन शरद पवार यांनी केले ( Sharad Pawar On Bigotry In Country ) आहे. ते शिराळा येथे भाजपाचे माजी मंत्री शिवाजीराव नाईक ( Ex Minister Shivajirao Naik ) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रवेश सोहळयाप्रसंगी बोलत ( Sharad Pawar In Sangli ) होते.
Sharad Pawar : धर्मांध वृत्तीच्या विरोधात आता लढाई लढावी लागेल - शरद पवार - Sharad Pawar In Sangli
देशामध्ये आता धर्मांध प्रवृत्ती वाढत आहेत. लोकांमध्ये धर्माच्या नावाने अंतर निर्माण केले जात आहे. अशा प्रवृत्तीच्या विरोधात आता आगामी काळामध्ये लढाई लढावी लागेल असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले ( Sharad Pawar On Bigotry In Country ) आहे.
शरद पवार
उसाचे उपपदार्थ करणे आवश्यक : तसेच यावेळी शरद पवार म्हणाले,ऊस शेती वाढत आहे,मात्र वाढणाऱ्या क्षेत्रातील ऊसाच गळीत आता कसे व्होईल यांची चिंता आहे. गळीत हंगाम दोन महिने पुढे सुरू ठेवावे लागतील. त्यामुळे ऊस शेती बाबत विचार करणं गरजेच आहे.फक्त ऊसा पासून फक्त साखर करून चालणार नाही, तर उप पदार्थ करावे लागतील.असा सल्ला यानिमित्ताने शरद पवारांनी साखर कारखानादारांना दिला.