महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

एकही पूरग्रस्त नागरिक सरकारला दोष देत नाही; महसूल मंत्री चंद्रकांत पाटलांचा राजू शेट्टींना टोला - महसूल मंत्री चंद्रकांत पाटील

एकही पूरग्रस्त नागरिक सरकारला दोष देत नाही, असा दावा महसूल व मदत पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील केला आहे. विरोधकांनी टीका करण्यापेक्षा सूचना कराव्यात, असा टोला त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना लगावला आहे.

महसूल मंत्री चंद्रकांत पाटलांचा राजू शेट्टींना टोला

By

Published : Aug 22, 2019, 11:38 PM IST

सांगली - एकही पूरग्रस्त नागरिक सरकारला दोष देत नाही, असा दावा महसूल व मदत पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील केला आहे. विरोधकांनी टीका करण्यापेक्षा सूचना कराव्यात, असा टोला त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना लगावला आहे. तसेच, पूरग्रस्तांना सर्व पातळीवर सरकारची मदत पोहचत असल्याचा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला. ते आज सांगलीमध्ये बोलत होते. सांगलीत पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी आले असताना पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

महसूल मंत्री चंद्रकांत पाटलांचा राजू शेट्टींना टोला

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी महापुराला केंद्र आणि राज्य सरकारचा असमन्वय जबाबदार असल्याचा आरोप केला होता. यावर बोलताना, आपण दोन्ही जिल्ह्यात सर्व पूरग्रस्त भागाची पाहणी करत आहोत. तिथे एकही पूरग्रस्त सरकारला दोष देत नाही, असे स्पष्टीकरण दिले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पूरग्रस्तांना देण्यात येणारी मदत, पंचनामे आणि नुकसान या सर्व बाबींचा आढावा पाटील यांनी घेतला. सानुग्रह अनुदान वाटप, ज्यांची घरे पडली त्यांना एका वर्षाचे घरभाडे, गाव आणि शहर पातळीवर पूरग्रस्तांचे पुनर्वसन याबाबतच्या सूचनादेखील त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. राज्य सरकारकडून पूरग्रस्तांना चार महिने धान्य पुरवण्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. त्याचबरोबर, पूरग्रस्त भागातील कामांचा आढावा आणि निर्णय घेण्यासाठी दर मंगळवारी मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक पार पडणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

महापुरात ज्या व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांना जीएसटी आणि इतर करांमध्ये सवलत आणि बँकांच्या हप्त्यांमध्ये एक वर्ष सूट मिळावी या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांची भेट घेतली आहे. तर, छोट्या व्यापाऱ्यांना 50 हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिली. केंद्रीय पातळीवरून याचा लवकरच निर्णय होईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

ABOUT THE AUTHOR

...view details