सांगली - पावसामुळे आलेल्या पुराने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे पंचनामे करण्यात आले आहेत कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही तसेच ज्या ठिकाणी पूर परिस्थितीमुळे नुकसान झाले आहे त्याचेही पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत Chief Minister Eknath Shinde visit to Sangli अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे विटा येथे शिवसेनेचे शिंदगटाचे आमदार अनिल बाबर यांच्या घरी सांत्वनपर भेट घेतली असता प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते
पुरामुळे झालेल्या नुकसानीची पंचनामे करण्यात आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांची विटा या ठिकाणी घरी भेट दिली आहे नुकतेच अनिल बाबर यांच्या पत्नी शोभा बाबर यांचे निधन झाले या पार्श्वभूमीवर बाबर कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली. यावेळी स्वर्गीय शोभा बाबर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत श्रद्धांजली वाहिली तसेच आमदार अनिल बाबर व कुटुंबीयांचे सांत्वन केले आहे त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पुरामुळे झालेल्या नुकसानीची पंचनामे करण्यात आले आहेत अशी माहितीही त्यांनी दिली आहे