महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजप महिला प्रदेशाध्यक्षा नीता केळकर सांगली मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात !

भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा नीता केळकर यांनी विधानसभेच्या उमेदवारीची मागणी केली आहे. त्यामुळे भाजपच्या उमेदवारीवरून बंडाळी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सांगली विधानसभा

By

Published : Sep 14, 2019, 3:01 PM IST

सांगली- शहरात भाजपच्या उमेदवारीवरून बंडाळी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा नीता केळकर यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. त्यामुळे विद्यमान भाजप आमदारांच्या विरोधात नीता केळकर या मैदानात उतरणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

निता केळकर सांगली विधानसभा मैदानात उतरणार

सांगलीतील भाजपचे जेष्ठ नेते नीता केळकर यांनी विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. नीता केळकरांनी मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून सांगली विधानसभा मतदार संघातील ग्रामीण भागात भेटीगाठी सुरू केल्या आहेत. त्यामुळे त्यांची विधानसभा लढण्याची तयारी सुरू असल्याचे स्पष्ट आहे. तीस वर्षांपासून नीता केळकर या भाजपमध्ये एकनिष्ठपणे कार्यरत आहेत. त्यांनी भाजपसाठी उत्कृष्ठ कामगिरी बजावली. तरी सुद्धा भाजप सत्तेत आल्यानंतर त्यांच्या पदरी फारसे काही पडले नाही. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाने संधी द्यावी, अशी मागणी केळकर यांच्या कार्यकर्त्यांमधून करण्यात येत आहे. दुसऱ्या बाजूला खुद्द नीता केळकर यांनीही विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी जोरदारपणे सुरू केली आहे. तसेच पक्षपातळीवर आपण उमेदवार मागणार असून कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही, अशी भूमिका निता केळकर यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत जाहीर केली आहे. त्यामुळे सांगलीतल्या भाजप उमेदवारीवरून आता बंडाळी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विद्यमान भाजपाचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासमोर नीता केळकर यांच्या उमेदवारी मागणीमुळे अडचणी निर्माण होणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details