सांगली -जिल्ह्यात आज (बुधवार) कोरोनाचे आणखी ९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये सांगली शहरातील एका महिलेचा समावेश असून इतर ८ जण हे ग्रामीण भागातील आहेत. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या १२४ झाली आहे. तर आतापर्यंत २६८ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून यापैकी १३५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्ह्यात ९ कोरोना रुग्णांची भर, बाधितांचा आकडा २६८ वर
सांगलीत बुधवारी दुपारपर्यंत ९ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली. यातील १ जण शहरातील तर इतर ८ जण हे ग्रामीण भागातील आहेत. यामुळे, जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या २६८ झाली आहे. सध्या ॲक्टिव कोरोना रुग्णांची संख्या १२४ असून आतापर्यंत १३५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, आतापर्यंत ९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे
जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज दुपारपर्यंत यात ९ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. हे सर्वजण मुंबईहुन आलेले आणि मुंबईहुन आलेल्या कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेले आहेत. आज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये शिराळा तालुक्याच्या मणदूर येथील १, किनरेवाडी येथील २, शिराळा शहरातील१ अशा ४ जणांचा समावेश आहे. तर, तासगाव तालुक्यातील शिरगाव येथील १, आटपाडी तालुक्यातील निबंवडे येथील २, जत तालुक्यातील निगडी खुर्द येथील १ आणि सांगली शहरातील १०० रोड येथील एका महिलेचा समावेश आहे.
या सर्व रुग्णांना मिरजेच्या कोरोना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर, संबंधित रुग्णांचा परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करत सील करण्यात आला आहे. यामुळे, जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या २६८ झाली आहे. तर, सध्या ॲक्टिव कोरोना रुग्णांची संख्या १२४ असून आतापर्यंत १३५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, आतापर्यंत ९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी दिली आहे.