महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बेकायदेशीर वृक्षतोडसह वाहतूक प्रकरणी 9 जणांना अटक - sangli forest department

सांगली जिल्ह्यातील कडेगाव येथे बेकायदेशीर वृक्षतोड करून वाहतूक करणाऱ्या ट्रकवर वनविभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी हणमंतवडिये येथे ट्रक चालक आणि मालकासह ९ जणांना अटक करण्यात आली आहे.

sangli corona update
बेकायदेशीर वृक्षतोडसह वाहतूक प्रकरणी 9 जणांना अटक

By

Published : Jul 19, 2020, 1:50 PM IST

सांगली - जिल्ह्यातील कडेगाव येथे बेकायदेशीर वृक्षतोड करून वाहतूक करणाऱ्या ट्रकवर वन विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी हणमंतवडिये येथे ट्रक चालक आणि मालकासह ९ जणांना अटक करत दहा हजारांच्या मुद्देमालासह ट्रक जप्त करण्यात आला आहे. मौजे हणमंतवडिये येथे बेकायदेशीररित्या वृक्षतोड करून वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती कडेगाव वन क्षेत्रपाल विभागाला मिळाली होती.

वनविभागाने सापळा रचून विनापरवाना झाडांची तोड करून वाहतूक करणाऱ्या ट्रकला पकडले. ताब्यात घेतलेल्या ट्रकमध्ये लिंब तसेच करंज या वृक्षप्रजातींचे लाकूड मोठ्या प्रमाणात आढळून आले आहे. त्यांनतर ट्रकमालक शामराव मारुती जगदाळे (रा-शेळकबाव, ता-कडेगाव) यांच्यासह इतर आठ मजुरांना अटक करत त्यांच्या विरोधात कडेगाव पोलीस ठाण्यात भारतीय वन अधिनियम 1927 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

यावेळी त्यांच्याकडून दहा हजारांच्या मुद्देमालासह ट्रक जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय कडेगाव-पलूस मार्फत पुढील तपास करण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details