महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगलीत तब्बल ३५४  कोरोना रुग्णांची भर, महापालिका क्षेत्रातील २११ जणांचा समावेश

दिवसभरात सांगली महापालिका क्षेत्रातील तब्बल २११ जणांना कोरोना लागण झाली आहे. ज्यामध्ये सांगली शहरातील १२२ आणि मिरज शहरातील ८९ जणांचा समावेश आहे.

new three fifty four corona patient found in sangli district
new three fifty four corona patient found in sangli district

By

Published : Aug 4, 2020, 8:59 AM IST

सांगली- जिल्ह्यात सोमवारी रेकॉर्ड ब्रेक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तब्बल ३५४ कोरोना रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये सांगली महापालिका क्षेत्रातील २११ जणांचा समावेश आहे. उपचार घेणाऱ्या सहा रुग्णांचा मृत्यू झाला असून उपचार घेणारे १०१ जण कोरोना मुक्त झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ऍक्टिव्ह रुग्ण संख्या १,८७८ तर एकूण आकडा ३ हजार ३४४ झाला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली.


सांगली जिल्ह्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. सोमवारी यामध्ये आणखी रुग्णांची भर पडली असून दिवसभरात रेकॉर्ड ब्रेक कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. ३५४ जणांचा अहवाल हा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर उपचार घेणाऱ्या ६ जणांचा मृत्यू झाला आहे.
यामध्ये सांगली १ ,मिरज १ ,कवठेपिरान १,बोरगाव १,सुरुल १,आणि मंगरूळ येथील एकाच मृतांमध्ये समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मृत्यू संख्या शंभरी पार झाली आहे.


दिवसभरात जिल्ह्यात तब्बल ३५४ नव्या रुग्णांची भर पडली आहे. ज्यामध्ये ग्रामीण भागापेक्षा सांगली महापालिका क्षेत्रातील रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे पालिका क्षेत्र कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे.

दिवसभरात सांगली महापालिका क्षेत्रातील तब्बल २११ जणांना कोरोना लागण झाली आहे. ज्यामध्ये सांगली शहरातील १२२ आणि मिरज शहरातील ८९ जणांचा समावेश आहे.


जिल्ह्यातील आजचे कोरोना रुग्ण -

१) आटपाडी तालुका - ०७

२) जत तालुका - १७

३) क.महांकाळ तालुका - २३

४) मिरज तालुका - ४८

५) पलुस तालुका - १२

६) वाळवा तालुका - २१

७) तासगांव तालुका - ०५

८) शिराळा तालुका -०२

९) कडेगाव तालुका -०७

१०) खानापूर तालुका- ०१


उपचार घेणारे तब्बल १०१ जण हे कोरोना मुक्त झाले आहेत. त्यांना डिस्चार्ज देऊन इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे.


कोरोना उपचार घेणारे १२५ जण हे अतिदक्षता विभागात असून यामधील ८८ जण हे ऑक्सिजनवर तर ३३ जण हे नॉन इन्व्हेजिव व्हेंटिलेटरवर आणि इन्व्हेजिव व्हेंटिलेटरवर ०४ जण उपचार घेत आहेत.

सोमवारी दिवसभरात वाढलेले रुग्ण व कोरोना मुक्त, त्यामुळे जिल्ह्यातील ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या १,८७८ झाली आहे.त्रतर जिल्ह्यात आता पर्यंत एकूण ३,३४४ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी आज पर्यंत १,४५७ जण कोरोना मुक्त झाले आहेत.तर १०५ जणांचा आता पर्यंत मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details