महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगलीत ९५ नवे कोरोनाबाधित रुग्ण; पालिका क्षेत्रातील ५७ जणांचा समावेश - 95 कोरोना रुग्ण वाढले

सांगली जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात तब्बल ९५ कोरोना रुग्णांची वाढ झाली. ४१ जण कोरोनामुक्त झाले तर ४ जणांचा मृत्यू झाला

Sangli corona update
सांगली कोरोना अपडेट

By

Published : Jul 26, 2020, 7:46 AM IST

सांगली -जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. शनिवारी दिवसभरात तब्बल ९५ कोरोना रुग्णांची भर पडली आहे.यामध्ये सांगली महापालिका क्षेत्रातील ५७ जणांचा समावेश आहे. ४ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दिवसभरात ४१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या ७४३ तर बाधितांची एकूण संख्या १हजार ५४५ झाली, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली आहे.

सांगली जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. शनिवारी उपचार घेणाऱ्या चार जणांचा मृत्यू झाला. यामध्ये मिरज तालुक्यातील समडोळी येथील १, तासगाव शहरातील १ आणि मिरज शहरातील २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दिवसभरात जिल्ह्यात तब्बल ९५ रुग्णांची भर पडली आहे.ज्यामध्ये ग्रामीण भागापेक्षा सांगली महापालिका क्षेत्रातील रुग्णांची संख्या अधिक आहे.दिवसभरात आढळून आलेल्या कोरोना रुग्णांच्या मध्ये सांगली महापालिका क्षेत्रातील तब्बल ५७ जणांचा समावेश आहे.ज्यामध्ये सांगली शहरातील ३८ आणि मिरज शहरातील १७ जणांचा समावेश आहे.

जिल्ह्यात शनिवारी वाढलेले तालुकानिहाय कोरोना रुग्ण-

आटपाडी- तडवळे ६ ,दिघंची १, पत्रेवाडी १,

कवठेमहांकाळ- कवठेमहांकाळ शहर २ ,

जत- जत शहर १ ,

मिरज- अंकली १, हरिपूर १ ,भोसे ३,खंडेराजुरी १,

पलूस - पलूस शहर २ खटाव १,

तासगाव- बस्तवडे १, मांजर्डे १ , सावळज १, निमाणी १,

वाळवा - आष्टा १ , येलूर १,कोरेगाव १,

शिराळा - वाकुर्डे १,गवळेवाडी१.

४१ जण हे कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना डिस्चार्ज देऊन इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन सेंटर मध्ये पाठवण्यात आले आहे.

कोरोनावर उपचार घेणारे १९ जण हे अतिदक्षता विभागात असून यामधील २ जण हे ऑक्सिजनवर तर १५ जण हे नॉन इन्व्हेजिव व्हेंटिलेटरवर तर २ जण इन्व्हेजिव व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

सांगलीत शनिवरपर्यंत पर्यंत ७५४ जण कोरोनामुक्त झाले आहेत तर ४८ जणांचा मृत्यू झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details