महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नूतन महापौर व राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांची घेतली भेट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा बद्दल बातमी

नूतन महापौर व राष्ट्रवाती काँगेसच्या पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांची भेटी घेतली. यावेळी नुतून महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांचे शरद पवारांनी अभिनंदन केले.

New Mayor and NCP office bearers met Sharad Pawar
नूतन महापौर व राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांची घेतली भेट

By

Published : Feb 27, 2021, 3:50 PM IST

Updated : Feb 27, 2021, 4:03 PM IST

सांगली -सांगली महापालिकेमध्ये भाजपाची सत्ता उलथून टाकता राष्ट्रवादी काँग्रेसने आपला झेंडा फडकावला आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्विजय सूर्यवंशी हे नूतन महापौर म्हणून निवडून आले आहेत. भाजपाचा करेक्ट कार्यक्रम करत राष्ट्रवादी काँग्रेसने मारलेल्या बाजीमुळे राज्यात मोठी चर्चा सुरू आहे. दरम्यान या विजयानंतर नूतन महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या भेटीसाठी बारामती मध्ये पोहोचले आहेत.

नूतन महापौर व राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांची घेतली भेट

दिग्विजय सूर्यवंशी यांच्यासोबत राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, माजी नगरसेवक आयुब बारगीर यांच्यासह राहुल पवार व बारामतीच्या नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे आदी नेते उपस्थित मंडळी आहेत. गोविंदबाग या ठिकाणी हे सर्व शरद पवार यांची भेट घेतली आहे.

पवारांनी दिल्या शुभेच्छा -

यावेळी नुतून महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांचे शरद पवारांनी अभिनंदन केले. यानंतर पवारांनी दिग्विजय सूर्यवंशी अंडी शहर अध्यक्ष संजय बजाज यांच्याशी शरद पवारांनी चर्चा करून महापालिकेच्या बाबतीत आढावा घेत, शुभेच्छा दिल्या.

Last Updated : Feb 27, 2021, 4:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details