सांगली - सांगली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात तासगाव, कवठेमहांकाळ, पलूस, खानापूर, आटपाडी, वाळवा आणि मिरज तालुक्यातया भागात द्राक्षांचा उत्पादन घेतले जाते. यांपैकी तासगाव नगरी द्राक्षांचे माहेरघर म्हणून ओळखली जाते. काही वर्षांपासून या द्राक्ष बागांना बदलत्या हवामानाचा मोठा फटका बसत आहे. अवकाळी पाऊस, कडाक्याची थंडी, गारपीठ, विविध रोगांचा प्रादुर्भाव यामुळे शेतकरी उध्वस्त होण्याचा मार्गावर आहे. यातून देखील अनेक शेतकरी आपल्या द्राक्षबागा जगवण्यासाठी मोठी धडपड करत आहेत. मात्र, निसर्गाची आणि सरकारचे सहकार्य नसल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.
द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या समोर वटवाघुळांचे नव संकट, बचावासाठी बागांवर जाळ्यांचे कुंपण - New crisis of bats in front of grape farmers
द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या मागे एकामागून एक संकटांची मालिका सुरूच आहे. बदलते हवामान, अवकाळी पाऊस आणि रोगांचा प्रादुर्भाव यामुळे मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांच्यावर वटवाघुळांच्या हल्ल्याचे संकट निर्माण झाले आहे. या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी आता अनेक शेतकरी द्राक्ष बागांवर जाळ्या अंथरून आपली बाग वाचवण्याची धडपड करत आहेत.
बागेत जाळ्या लावल्या - गेल्या काही महिन्यांपासून तासगाव, मिरज आणि वाळवा तालुकयात वटवाघाने हल्ला करत द्राक्षबागा स्पष्ट केल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे झालेल्या द्राक्षबाग शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. प्रयत्न करत आहेत त्यासाठी मासे पकडण्यासाठी वापरण्यात येणारे जाळी अंथरली जात आहे. आंबट गोड द्राक्ष वटवाघुळाचे आवडतं खाद्य आहे. आणि सध्या द्राक्ष हंगाम सुरू झाला आहे. आपल्या द्राक्ष बागांचा वटवाघळांपासून बचाव करण्यासाठी शेतकरी आपल्या बागेत जाळ्या अंथरत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पहायला मिळत आहे.
द्राक्षावर बुरशीजन्य रोग पसरण्याची शक्यता - सोलापूर जिल्ह्यासह सांगली जिल्ह्यातही अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. यामुळे सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. दरम्यान, सांगलीमध्ये हलक्या पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्यातील द्राक्षाचे पीक सध्या काढणीवर आहे. अशा परिस्थितीत अवकाळी पावसामुळे द्राक्षावर बुरशीजन्य रोग पसरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.