सांगली - सांगली जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत आहे. बुधवारी रेकॉर्ड ब्रेक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. दिवसभरात तब्बल १०६ कोरोना रुग्णांची भर पडली आहे. ज्यामध्ये सांगली महापालिका क्षेत्रातील ७९ जणांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्ण संख्या ५३८ झाली आहे. तर एकूण रुग्णांची संख्या १ हजार २१४ झाला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली आहे.
सांगली जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. बुधवारी एकाच दिवसात रेकॉर्ड ब्रेक कोरोना रुग्ण सापडले आहेत. तब्बल १०६ रुग्णांची भर पडली आहे. तर उपचार घेणाऱ्या एका मिरजेच्या समतानगर येथील एका ५७ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. तसेच १३ रुग्ण हे नॉन इन्व्हेजिव व्हेंटिलेटरवर आहेत.
बुधवारी आढळून आलेल्या कोरोना रुग्णांमध्ये सांगली महापालिका क्षेत्रातील तब्बल ७९ जणांचा समावेश आहे. ज्यामध्ये सांगली शहरातील ६३ आणि मिरज शहरातील १६ जणांचा समावेश आहे. सांगली शहरातील पुष्कराज चौक, धरमसी हॉस्पिटल, सांगली बायपास रोड, मंगेश्वर चौक, भारत सूत गिरणी, एसटी कॉलनी संजयनगर, जगदाळे प्लॉट, सांगलीवाडी, पाटणे गल्ली खनभाग, माधवनगर रोड, आंबेडकर नगर, शामरावनगर, इंदिरानगर, जाहीर मस्जिद परिसर, टिम्बर एरिया, भुई गल्ली, रमामाता नगर भागामध्ये कोरोना रुग्ण आढळले आहेत.
मिरज शहरातील जीएमसी हॉस्पिटल हॉस्टेल, मराठे मिल, मंगळवार पेठ मिरज, सोमशेखर हॉस्पिटल, भारती हॉस्पिटल हॉस्टेल, अलफोन्स स्कुल, रेल्वे क्वार्टर्स,
ज्योतिबा कॉलनी बेथेलनगर, पाटील गल्ली, लक्ष्मीनगर, रोहिदासनगर येथे कोरोना रुग्ण आढळले आहेत.
बुधवारी तालुकानिहाय आढळलेले रुग्ण -
आटपाडी तालूका - नेलकरंजी २ ,तडवळे १.
जत तालुका - जत शहर ३,रोजावाडी १, असंगी तुर्क १.