सांगली - जिल्ह्यात मंगळवारी आणखी तीन कोरोना रुग्ण आढळले.आटपाडी तालुक्यातील दोन जण आणि तासगाव येथील एकाचा यामध्ये समावेश आहे. एक जण मुंबईहून आला आहे, तर दोघे जण मुंबईहून आलेल्या कोरोनाबाधितांच्या संपर्कातील आहेत. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा हा 39 झाला आहे. सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी ही माहिती दिली आहे.
सांगली जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाचे आणखी तीन जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तासगाव तालुक्यातील कचरेवाडी येथे मुंबईहून आलेल्या एकास कोरोना लागण झाली आहे. तर आटपाडी तालुक्यातील बनपुरी येथील २४ मे रोजी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाचे 41 वर्षीय वडील, तसेच बनपुरी येथीलच पॉझिटिव्ह रुग्णाची दहा वर्षीय बहीण यांना कोरोनाची लागण झाली आहे. या सर्वांवर मिरजेच्या कोरोना रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सांगलीत आणखी तीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह.. जिल्ह्याचा आकडा 39वर - सांगली कोरोना रुग्ण संख्या
सांगली जिल्ह्यात मंगळवारी आणखी तीन रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 39 झाली आहे. यातील तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
सांगलीत आणखी तीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह
आजपर्यंत सांगली जिल्ह्यात 88 जण कोरोनाबाधित ठरले आहेत, त्यापैकी 47 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून दोघांचा मृत्यू झाला आहे.तर सध्याच्या 39 कोरोना रुग्णांपैकी तीन रुग्णांची स्थिती चिंताजनक आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली.