महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगली जिल्ह्यात 2 कोरोना रुग्णांचा मृत्यू ; तर नव्या 34 रुग्णांची नोंद

जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी चौघांचा मृत्यू झाला. तर दिवसभरात 34 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 हजार 108 वर पोहचला. तसेच आतापर्यंत 439 जण कोरोनामुक्त झाले असून 41 जणांचा मृत्यू झाला आहे.

सांगली कोरोना अपडेट
सांगली कोरोना अपडेट

By

Published : Jul 22, 2020, 7:27 AM IST

सांगली - जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. मंगळवारी कोरोनामुळे आणखी चौघांचा मृत्यू झाला. तर दिवसभरात 34 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. ज्यामध्ये सांगली महापालिका क्षेत्रातील 19 जणांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सक्रिय रुग्ण संख्या 628 झाली आहे. तर जिल्ह्यातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 हजार 108 वर पोहचला. तसेच आतापर्यंत 439 जण कोरोनामुक्त झाले असून 41 जणांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. एकाच दिवसात उपचार घेणाऱ्या 4 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सांगली शहरातील विजयनगर येथील 45 वर्षीय पुरुष , बुरूडगल्ली येथील 73 वर्षीय वृद्ध पुरुष, आंबेडकर नगर येथील 77 वर्षीय वृद्ध पुरुष आणि मिरज शहरातील अष्टविनायक चौक येथील 70 वर्षीय वृध्द महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यातील कोरोना मृत्यू आकडा 41 झाला आहे.

नव्या आढळलेल्या रुग्णांमध्ये सांगली महापालिका क्षेत्रातील तब्बल 19 जणांचा समावेश आहे. ज्यामध्ये सांगली शहरातील 14 आणि मिरज शहरातील 5 जणांचा समावेश आहे. यात सांगली शहरातील वसंत कॉलनी, सावली बेघर, हॉटेल पै प्रकाश, वानलेस हॉस्पिटल कॅम्पस, शाहूनगर विजयनगर, शिवाजीनगर, अस्वले गल्ली, मार्केट यार्ड समोरील किसान चौक, मिरज शहरातील शास्त्री चौक पिरजादे प्लॉट,गणेश तलाव गोठण गल्ली, सेवासदन हॉस्पिटल परिसर, कच्ची हॉल आणि कमानवेस या भागांचा समावेश आहे.

उर्वरीत 15 रुग्ण हे कडेगाव शहर 2, कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोण 1, कवठेमहांकाळ 1 , खानापूर तालूक्यातील विटा 1 ,मिरज तालुक्यातील तुंग 1, समडोळी 1, तासगाव तालुक्यातील तुरची 1, जरंडी 1, शिराळा तालुक्यातील शिराळा शहर 2 ,वाळवा तालुक्यातील इस्लामपूर 1 , कमेरी ३ येथील आहेत. दरम्यान, अतिदक्षता विभागात 23 रुग्ण उपचार घेत असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. यापैकी 11 जण हे ऑक्सिजनवर तर 12 जण हे नॉन इन्वेसिव व्हेंटिलेटरवर आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details