महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गळा चिरून पुतण्याने केला चुलत्याचा निर्घृण खून, तासगावच्या कुमठे येथील घटना - घर वाटणीच्या वादातून खून

घर वाटणीच्या वादातून मृत भीमराव गाडे आणि त्यांचा पुतण्या रोहित उर्फ बाला गजानन गाडे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता.

तासगाव
तासगाव

By

Published : May 19, 2020, 4:10 PM IST

सांगली - घर वाटणीच्या वादातून पुतण्याने चुलत्याचा गळा चिरून निर्घृण खून केला. सांगलीच्या तासगाव तालुक्यातील कुमठेमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. भीमराव तुकाराम गाडे (वय ५५) असे मृत व्यक्तीचे नाव असून कोयत्याने हल्ला करत ही हत्या करण्यात आली आहे.

घर वाटणीच्या वादातून मृत भीमराव गाडे आणि त्यांचा पुतण्या रोहित उर्फ बाला गजानन गाडे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. सोमवारी दुपारी याच कारणातून पुन्हा वादावादीचा प्रकार घडला होता. या घटनेनंतर भीमराव गाडे रात्री झोपण्यासाठी घराशेजारी असणाऱ्या समाज मंदिरामध्ये गेले होते. त्या ठिकाणी झोपले असता मध्यरात्रीच्या सुमारास पुतण्या रोहित हा तेथे पोहोचला आणि त्याने धारदार कोयत्याने चुलत्याच्या गळ्यावर जोरदार वार केले. यात जवळपास शीर आणि धड हे तुटले, त्यामुळे गाडे यांचा जागीच मृत्यू झाला. तर घटनेनंतर संशयित रोहित उर्फ बाला गजानन गाडे फरार झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच तासगाव पोलिसांनी धाव घेत पंचनामा करून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details