सांगली - कृष्णा नदीच्या महापुरात अडकलेल्या हजारो नागरिकांनी पुराच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढण्यासाठी आर्मी, नेव्ही, कोस्ट गार्ड, एसडीआरएफ, आणि एनडीआरएफ अर्थात राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाचे जवान अथक मेहनत घेत आहेत. देशात कुठेही कसलीही आपत्ती आली की धावून जाणे हे आपले आद्यकर्तव्य मानून काम करणारे जवान, सांगलीकरांच्या मदतीलाही धावून आले होते.
महापुरातील देवदूतांचा पूरग्रस्त सांगलीकरांच्या वतीने सहृदयी सत्कार - सांगली
या महापुरात आज लाखो लोकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. असे असतानाही लोकांचे जीव वाचविण्यासाठी आपल्या जिवाची बाजी लावण्याऱ्या एनडीआरएफ आणि सांगली पोलीस दलाबद्दल ऋण व्यक्त करण्यासाठी, पूरग्रस्त नागरिकांनी एकत्र येऊन या जवानांचा सत्कार करत, त्यांचे आभार मानले आहेत.
या सर्वांच्या मदतीला सामाजिक कार्यकर्ते तसेच सांगली पालिका आणि पोलीस प्रशासनही झटत होते. त्यामुळे हजारो लोकांचे जीव आज वाचले गेले आहेत. मात्र, या महापुरात आज लाखो लोकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. असे असतानाही लोकांचे जीव वाचविण्यासाठी आपल्या जिवाची बाजी लावण्याऱ्या एनडीआरएफ आणि सांगली पोलीस दलाबद्दल ऋण व्यक्त करण्यासाठी, पूरग्रस्त नागरिकांनी एकत्र येऊन या जवानांचा सत्कार करत, त्यांचे आभार मानले आहेत.
या सर्वांना मानाचे फेटे बांधून आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. पूरग्रस्त भागातील नागरिक आणि सामजिक कार्यकर्त्यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. नगरसेवक मंगेश चव्हाण यांनी या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. या बचावकार्यात मोलाची भूमिका पार पाडणारे सांगली शहर उपअधीक्षक अशोक वीरकर देखील याप्रसंगी उपस्थित होते. या सत्काराने एनडीआरएफ पथक आणि सांगली पोलीस भारावून गेले होते.