महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जोरदार शक्तिप्रदर्शनाने राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल - जयंत पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखर

काँग्रेचे प्रदेशाध्यक्ष जयंतपाटील यांनी शक्ती प्रदर्शन करत इस्लामपूर मतदार संघातून उमेदावरी अर्ज दाखल केला. 30 वर्षापासून वाळवा इस्लामपूर मतदार संघातून जयंत पाटील विजयी होत आहेत.

राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

By

Published : Oct 1, 2019, 2:41 PM IST

सांगली -राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत इस्लामपूर मध्ये आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. इस्लामपूर-वाळवा मतदार संघातून पाटील यांनी हजारो कार्यकर्त्यांसह आपली उमेदवारी दाखल केली.

राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

हेही वाचा -सांगलीत काँग्रेसकडून विश्वजित कदम, विक्रम सावंत यांची उमेदवारी जाहीर!

एकीकडे राज्यात राष्ट्रवादीला गळती लागली असताना, दुसरीकडे जोरदार शक्तिप्रदर्शन करत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. गेल्या 30 वर्षापासून वाळवा इस्लामपूर मतदार संघातून जयंत पाटील विजयी होत आहेत. यंदा सातव्यांदा विधानसभेच्या रिंगणात जयंत पाटील उतरले आहेत. आज अर्ज भरण्यासाठी जयंत पाटील यांच्या समर्थकांनी आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी इस्लामपूर मध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन केले. आम्ही साहेबांसोबत म्हणत हजारो कार्यकर्ते जयंत पाटलांसाठी इस्लामपुरात एकवटले होते. जयंत पाटील यांनी स्थानिक नेत्यासमवेत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी हजारोंच्या संख्यने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते इस्लामपुरात आले होते. यावेळी पारंपरिक वाद्याच्या गजरात हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने रॅली द्वारे जयंत पाटील यांनी इस्लामपूर मधून आपली उमेदवारी दाखल केली आहे. यावेळी राजवर्धन व प्रतीक पाटील ही दोन्ही मुलेही सहभागी झाली होती.

हेही वाचा - उमेदवारी नाही दिल्यास वेगळा विचार करू; दिनकर पाटलांचा भाजपला इशारा

ABOUT THE AUTHOR

...view details