सांगली - 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकाविरोधात सांगलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करण्यात आल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीकडून भाजपविरोधात निदर्शने करण्यात आली.
'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' पुस्तकप्रकरणी सांगलीत राष्ट्रवादीची निदर्शने भाजपकडून प्रकाशीत करण्यात आलेल्या 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' पुस्तकाच्या विरोधात महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटत आहेत. या पुस्तकातून छत्रपती शिवाजी महाराजांसोबत नरेंद्र मोदींची तुलना करण्यात आल्याने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत असून हे पुस्तक मागे घेण्याची मागणी करण्यात येत आहे.
हेही वाचा - अंधत्वावर मात करत इस्लामपूरमधील शितल साळुंखे बनली 'रेडिओ जॉकी'
याप्रकरणी सांगलीत मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून भाजपच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. शहरातील राष्ट्रवादी भवनसमोर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी एकत्रीत येऊन भाजपचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. तसेच भाजपच्या विरोधात जोरदार निदर्शने करत घोषणाबाजी केली. छत्रपती शिवाजी महाराज यांची कोणाशी तुलना होऊ शकत नाही, भाजपने केलेले हे कृत्य छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि समस्त महाराष्ट्राचा अवमान करणारा असल्याचा आरोप यावेळी राष्ट्रवादीकडून करण्यात आला. तसेच या पुस्तकावर बंदी घालून पुस्तक छापणाऱ्या विरोधात कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
हेही वाचा - थकीत वेतनासाठी सांगलीत कर्मचाऱ्यांचे मोबाईल टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन