सांगली - कायदा सुव्यवस्थेवरून भाजपाचे मंत्री आणि खासदार, त्यांच्या भारतीय जनता लॉंड्री सरकारला घरचा आहेर देत असतील,तर गृहमंत्र्यांना आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे, असा टोला खासदार सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. तसेच ओरबडून आलेले सरकार,कोणाच्या भरोशावर चाललंय हे देवालाच ठाऊक, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे.
आशा स्वयंसेविकांना सायकल वाटप क्रांती अग्रणी जी.डी.बापू लाड यांच्या जन्मशताब्दी निमित्त कुंडल या ठिकाणी विविध विकासकामांचे उद्घाटन आणि आशा स्वयंसेविकांना सायकल वाटप समारंभ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते संपन्न झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषद आमदार अरुण लाड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गृहमंत्र्यांनी आत्मचिंतन करायला हवंयावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगली जिल्ह्यातील भाजपाचे कामगार मंत्री सुरेश खाडे आणि भाजपाचे खासदार संजयकाका पाटील यांनी कायदा सुव्यवस्थेवरून प्रश्न उपस्थित करत गृहमंत्री यांच्याकडे तक्रार करणार असल्याच्या प्रश्नावरून बोलताना खासदार सुळे म्हणाल्या, राज्यातले पोलीस हे चांगले काम करतात. जर का गुन्हेगारी वाढली असेल,तर प्रशासन,मंत्रालय कोण चालवतय, त्यांनी याचे आत्मचिंतन करायला हवे. जरा भारतीय जनता लॉन्ड्रीगचे मंत्री व खासदार कायदा सुव्यवस्थे विरोधात बोलत असतील,तर या राज्याचे गृहमंत्री यांनी याचा आत्मचिंतन करायला हवं,असा टोला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खासदार सुळे यांनी लगावला आहे.
हे सरकार कोणाच्या भरोशावर चाललंययावेळी सुळे यांनी राज्यातल्या शिंदे आणि फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. राज्यात आलेल्या सरकार ओरबडून आले आहे. गेल्या साडेतीन महिन्यात कशाही प्रकारचे निर्णय आणि घोषणा या सरकारकडून करण्यात येत आहे. त्यामुळे हे सरकार कोणाच्या भरोशावर चाललंय हे देवालाच ठाऊक, अश्या शब्दात शिंदे-फडणवीस सरकारवर सुळे यांनी टीका केली आहे.