सांगली - राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर अप्रत्यक्ष सडकून टीका केली आहे. पडळकरांची तुलना थेट श्वानाशी करत तोंड सांभाळून बोलण्याचा इशारा दिला आहे. मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे एका कार्यक्रमात बोलताना मिटकरी यांनी पडळकरांवर निशाणा साधला.
अमोल मिटकरींची गोपीचंद पडळकरांवर नाव न घेता जहरी टीका - gopichand padalkar
आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर वारंवार टीका करणे सुरूच ठेवले आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी बोचऱ्या शब्दात पडळकरांवर निशाणा साधला आहे
भली भली संपली, तू कोण खसखस..
तसेच आपल्या गुरूंनी आपल्याला विरोधाला विरोध करायचे नाही हे शिकवले, पण टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम करायचा असतो असे म्हणत मिटकरी यांनी सूचक इशाराही यावेळी दिला. तसेच त्यांनी यावेळी एका श्वानाची आणि बैलाची गोष्ट सांगितली, बैलाच्या मागे श्वान भूकत मागे लागतो, पण बैल एक दोनदा, तीनदा बघतो आणि चौथ्यांदा मात्र, श्नानाला लाथ मारतो. त्यामुळे वेट अँड वॉच, भले भले संपले बेट्या तू कोण खसखस, पण बोलताना आपण तोंड सांभाळून बोलले पाहिजे, असा इशारा आमदार मेटकरी यांनी यावेळी दिला.