सांगली - राज्याचे जलसंपदामंत्री व राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे सुपुत्र प्रतीक पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. प्रतीक पाटील यांनी स्वत: सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी जयंत पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली होती.
कोरोनाची लागण झाल्यानंतर प्रतीक पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहली आहे. माझी प्रकृती उत्तम आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी विलगीकरणात आहे. सर्वांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घ्यावी, मास्क आणि सॅनिटायझर याचा नियमित वापर करावा, असे आवाहन प्रतीक पाटील यांनी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून केलं आहे.