महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चंद्रकांत पाटलांच्यात दम होता, तर 'तेथे' का हिसका दाखवला नाही - अण्णासाहेब डांगे - सागंली विधानसभा निवडणूक 2019

शरद पवारांना हिसका दाखवण्याचा इशारा महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांनी दिला होता. यावर जाहीर सभेत बोलताना माजी मंत्री व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे यांनी चंद्रकांत पाटलांबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. ते सांगलीच्या कवठेमहांकाळ येथे आयोजित प्रचार सभेत बोलत होते.

संपादित छायाचित्र

By

Published : Oct 14, 2019, 12:40 AM IST

सागंली - दम होता, तर 'तेथे' का हिसका दाखवला नाही, अशा शब्दात महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांच्या वैयक्तिक आयुष्यावर टीका करताना माजी मंत्री व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे यांची जीभ घसरली आहे. शरद पवारांना हिसका दाखवण्याचा इशारा महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांनी दिला होता. यावरून बोलताना डांगे यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे. ते सांगलीच्या कवठेमहांकाळ येथे आयोजित प्रचार सभेत बोलत होते.

तर 'तेथे' का हिसका दाखवला नाही...

सांगलीच्या तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुमनताई आर आर पाटील यांच्या प्रचारार्थ कवठेमहांकाळ येथे रविवारी राष्ट्रवादी नेत्यांची जाहीर सभा पार पडली. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे यांच्यासह जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा - वास्तव लपवून मोदींनी देश बरबाद केला - राहुल गांधी

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी बोलताना धनगर आरक्षणावरून सर्वप्रथम मंत्री महादेव जानकर यांच्यावर टीका केली. डांगे म्हणाले, निवडणुकीनंतरही, हे सरकार धनगर आरक्षण देणार नाही. या सरकारने धनगर आरक्षणाची वाट लावली. धनगर समाजाचे नेते महादेव जानकर कुठे आहेत, असा सवाल करत हे सत्तेचे गुलाम आहेत. सत्ता मिळवण्यासाठी वाटेल ते करणारे हे नेते आहेत, अशी टीका डांगे यांनी केली.

हेही वाचा - 'कितीतरी पंतप्रधान येऊन गेले पण 370 कलम हटविण्याची ताकद मोदींमध्येच'

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना हिसका देण्याच्या इशाऱ्यावरून डांगे यांनी पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला. चंद्रकांत पाटील यांना शरद पवारांच्या मोठेपणाचा आदर, सन्मान आहे की नाही? आम्ही तुमच्यावर टीका केली, पण अशी भाषा कधी वापरली नाही. राजकारणात विरोधक असतो, शत्रू नाही. तुमची हिसका दाखवण्याची भाषा शोभणारी नाही. तसेच हिंमत असती तर पाटील हे पदवीधर मधून उभे राहिले असते. पण निवडून येणार नसल्याने आता विधानसभा निवडणुकीत उभे राहिले आहेत, असा टोलाही डांगे यांनी लगावला. मी चंद्रकांत दादा यांच्या कार्यकर्त्याला 'दादांना किते मुले आहेत, ते विचारले असता, त्यांना मुले नाही, असे सांगितले. त्यामुळे चंद्रकांत दादांच्यामध्ये दम होता, तर त्यांनी तर तिथे का दाखवला नाही, अशा बोचऱ्या शब्दात मंत्री पाटील यांच्यावर वादग्रस्त टीका केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details