महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सचिन अहिर यांच्या पक्षत्यागाचे दुःख जरूर पण पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही - जयंत पाटील - सांगली

सचिन अहिर यांच्या जाण्याने मुंबई राष्ट्रवादीवर काही परिणाम होणार नाही. मात्र संकटाच्या आणि लढाईच्या वेळी जो सोबत राहतो, त्यातच कस लागतो अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी अहिर यांच्या शिवसेना प्रवेशावर टीका केली आहे.

अहिर यांच्या जाण्याचा राष्ट्रवादीवर कोणताही परिणाम होणार नाही - जयंत पाटील

By

Published : Jul 25, 2019, 8:20 PM IST

सांगली - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी, सचिन अहिर यांच्या जाण्याने मुंबई राष्ट्रवादीवर काही परिणाम होणार नाही. मात्र अहिर यांच्या शिवसेनेत जाण्याने आम्हाला दुःख वाटतंय, अशी प्रतिक्रिया पाटील यांनी आज सांगलीतील आष्टा येथे दिली आहे.

अहिर यांच्या जाण्याचा राष्ट्रवादीवर कोणताही परिणाम होणार नाही - जयंत पाटील

संकटाच्या आणि लढाईच्या काळात जो सोबत राहतो त्याचाच कस लागतो

अहिर यांच्या जाण्याने मुंबई राष्ट्रवादीवर काहीच परिणाम होणार नाही. त्यांच्या शिवसेनेत जाण्याने आम्हाला दुःख वाटतंय, पण त्यांनी हा निर्णय कोणत्या कारणांनी घेतला हे काही कळलं नाही. कदाचित त्यांच्या मतदारसंघात त्यांना दिसत असल्याने, अडचणींमुळे ते शिवसेनेत गेले असतील. संकटाच्या आणि लढाईच्या काळात जो सोबत राहतो त्याचाच कस लागतो, अशा शब्दात जयंतराव पाटील यांनी अहिर यांच्या शिवसेना प्रवेशावर टीका केली आहे.

महाराष्ट्रातील सरकारही कर्नाटक प्रमाणे आमदारांना आकर्षित करत आहे

कर्नाटक प्रमाणेच महाराष्ट्रातील सरकारही इतर पक्षांच्या आमदारांना आकर्षित करण्याचे काम करत आहे. विधानसभेच्या तोंडावरच हे सरकार सत्तेसाठी काहीही करत असल्याचे आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.

प्रदेशाध्यक्ष आपण असल्याने अजितदादांनी ते विधान केले

अजित पवार यांनी, सचिन अहिर यांच्या पक्षप्रवेशावर जयंत पाटीलच बोलतील. असे विधान केले होते. या विधानावर स्पष्टीकरण देताना प्रदेशाध्यक्ष आपण असल्याने माझे आणि अजित पवारांचे या विषयावर बोलणे झाले होते. मीच या विषयावर बोलण्याचे आमच्या दोघांमध्ये ठरले होते. असे सांगितले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन अहिर यांनी मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. सचिन अहिर हे राष्ट्रवादी काँग्रेसचा मुंबईमधला चेहरा मानले जात होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शिवसेनेत जाणे हा राष्ट्रवादीसाठी सर्वात मोठा धक्का मानला जातो आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details